भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मन मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले ‘ही यशोगाथा…’

करोनानंतर भारतामध्ये ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुपरमार्केटपासून ते रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत सर्वांकडे आता युपीआय पेमेंटची सुविधा आहे. दरम्यान, भारताच्या या प्रगतीने जर्मनीचे मंत्री भारावले आहेत. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांनी भारतातील या सुविधेचा लाभ घेतला असून सोपी पद्धत पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.  भारतातील जर्मन दूतावासाने रविवारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक केलं असून ट्विटरला पोस्ट शेअर केली आहे. हा भारताच्या यशोगाथेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले आहेत. 

जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांचे रस्त्यावर भाजी खरेदी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये  ते रस्त्याच्या शेजारी बसणाऱ्या भाजीवाल्याकडे खरेदी करताना दिसत आहे. यानंतर ते UPI च्या सहाय्याने पेमेंट करतानाही दिसत आहेत. 

ही पोस्ट शेअर करताना जर्मन दुतावासाने लिहिलं आहे की, “भारताच्या यशोगाथेपैकी एक म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा. UPI प्रत्येकाला काही सेकंदात व्यवहार करण्यास सक्षम करतं. लाखो भारतीय त्याचा वापर करतात. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांना UPI पेमेंटची साधेपणा अनुभवता आली. यामुळे ते प्रचंड भारावले आहेत”.

हेही वाचा :  अभिमानास्पद! ...अन् 14000 फुटांवरुन मराहाष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!

वोल्कर विसिंग हे बंगळुरुत 19 ऑगस्ट रोजी झालेल्या G20 डिजिटल मंत्र्यांच्या मीटिंगसाठी उपस्थित होते. दरम्यान, जर्मनीच्या दुतावासाने केलेल्या पोस्टवर सोशल मीडिया युजर्स व्यक्त झाले आहेत. भारताच्या डिजिटल आर्थिक क्रांतीचा भाग झाल्याबद्दल युजर्सनी त्यांचे आभार मानले आहेत. 

एका युजरने म्हटलं आहे की, “भारताच्या डिजिटल आर्थिक क्रांतीचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद. शेअर करत रहा आणि वापरत राहा.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, “जर्मनमधील व्यापारी आणि ग्राहकांसाठी हा एक आशीर्वादच आहे, जे रोख व्यवहार करताना फार संघर्ष करतात”.

उल्लेखनीय बाब म्हणजे, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारताची जलद पेमेंट प्रणाली आहे. UPI ग्राहकांना 24 तासात कधीही पेमेंट त्वरित करण्याची सुविधा देते. UPI ग्राहकाने तयार केलेला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरते. आतापर्यंत, श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर यांनी यासाठी भारतासोबत भागीदारी केली आहे. जुलैच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्स UPI पेमेंट यंत्रणा वापरण्यास सहमत असल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा :  Gold Rate Today: धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …