UPI वरुन पेमेंट अयशस्वी झाले तर? हे काम लगेच करा; अडकलेले पैसे त्वरित खात्यात ट्रान्सफर

What To Do If UPI Payment is Stuck : सध्या अनेक जण हातातील स्मार्टफोनद्वारे UPI Payment ला प्राधान्य देतात.  UPI मुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले तरी अनेकवेळा काही समस्या उभी राहते. खरेदी केल्यानंतर आता आपण बऱ्याचवेळा UPI ने पेमेंट करतो. रेशन घेणे असो किंवा ऑनलाइन पेमेंट असो. UPI ने सर्व काही करता येते. UPI पेमेंटवर बरेच काही लोक अवलंबून आहेत. परंतु अनेक वेळा UPI पेमेंट करताना पेमेंट पेंडिंग होते. ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो. UPI व्यवहारादरम्यान पेमेंट अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही चुकीचा UPI आयडी टाकला असेल, देणाऱ्या व्यक्तीचा पत्ता चुकीचा असेल, बँक सर्व्हर डाऊन असेल किंवा तुमचे इंटरनेट कनेक्शन काम करत नसेल, तर UPI ट्रान्सफर अयशस्वी होऊ शकते. तुम्हाला अशाच पेमेंट समस्या येत असतील तर तुम्ही या काही टिप्स फॉलो करु शकता.

UPI payment मर्यादा किती?

अनेक बँकांनी दररोज पेमेंट करण्यावर मर्यादा घातल्या आहेत. पेमेंट गेटवेने UPI व्यवहारांच्या दैनंदिन मोजणीवर मर्यादा घातली आहे. तसेच, NPCI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका UPI व्यवहारात हस्तांतरित करता येणारी कमाल रक्कम  1 लाख रुपये आहे. त्यामुळे, जर तुम्ही दैनिक मनी ट्रान्सफर मर्यादा ओलांडली असेल किंवा सुमारे 10 UPI व्यवहार केले असतील, तर तुम्हाला 24 तास प्रतीक्षा करावी लागेल जेणेकरुन तुमची दैनिक मर्यादा अपटेड करता येईल. तुम्ही भिन्न बँक खाते किंवा पेमेंट पद्धत वापरुन पेमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मन मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले 'ही यशोगाथा...'

UPI पेमेंट करताना या गोष्टी जाणून घ्या

UPI पेमेंट करताना योग्य UPI आयडी आणि ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांचा पत्ता तपासा . तुम्ही योग्य माहिती भरा आणि कोणतीही त्रुटी आली नसल्याचे जाणून घ्या आणि पेमेंट करा.

अनेक वेळा बँकांचे सर्व्हर डाऊन असू शकतात. ज्यामुळे पेमेंट अयशस्वी होऊ शकते. तुम्ही इतर कोणत्याही उपायावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी, तुम्ही बँकेची स्थिती जाणून घेतली पाहिजे.

तुमचे इंटरनेट कनेक्शन योग्यरित्या कार्य करत असल्याचे जाणून घ्या. तुमचे इंटरनेट कनेक्शन स्थिर नसल्यास, स्थान बदलण्याचा किंवा भिन्न नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न करा.

UPI पेमेंट करताना अडचण आली तर…

तुम्ही केलेल्या सर्व पडताळणीनंतरही पेमेंट अयशस्वी झाल्यास, तुम्ही तुमच्या UPI सेवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा. त्यांना तुमच्या समस्या आणि तपशीलांबद्दल माहिती द्या आणि त्यांना मदतीसाठी विचारा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘अग्रवालने कोणाला..’

Uddhav Thackeray Group Slams Pune Police: पुण्यातील कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी झालेल्या पोर्शे कारच्या …

Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून देशाच्या एका किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रिवादळाचा (Remal Cyclone) धोका …