आठ वर्षांच्या चिमुरडीवर पिटबुलचा हल्ला, दात आणि पंजामारुन केले गंभीर जखमी

Pitbull Attack News: पाळीव कुत्र्यांनी लहान मुले आणि जेष्ठांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्येही असाच प्रकार पुन्हा घडला आहे. घराच्या बाहेर खेळणाऱ्या आठ वर्षांच्या चिमुकलीवर एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केला आहे. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली आहे. (Pitbull Dog Attack On Girl) 

सायकल चालवत असताना हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, पिटबुलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचं नाव वर्णका आहे. ती तिच्या बहिणीसोबत घराच्या बाहेर सायकल चालवत होती. तर, शेजारी राहणारा मुलगा त्याच्या पिटबुल कुत्र्याला फिरवत होता. त्याचवेळी तिथे धावत आलेल्या पिटबुल कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर ती सायकलवरुन खाली पडली. वर्णिका खाली पडल्यानंतर पिटबुलने तिला जागोजागी चावा घेतला आहे. तिच्या शरिरावर जागोजागी दातांनी आणि पंजाने वार केले आहेत. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 

कुत्र्याने तिचे लचके तोडले

पिटबुलने हल्ला केल्यानंतर वर्णिका आणि तिच्या बहिणीने आरडा-ओरडा केला. दोघींचा आवाज ऐकून घरातील लोक धावत आले. तेव्हा पिटबुल वर्णिकाच्या शरिराचे लचके तोडत होता. समोरचे दृश्य पाहून तिच्या कुटुंबीयांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेचच तिथे धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून तिला सोडवले. 

हेही वाचा :  Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

वर्णिका जागेवरच बेशुद्ध झाली

पिटबुलच्या हल्ल्यात वर्णिका गंभीर जखमी झाली आहे. तिला लगेचच रुग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणात रक्त गेल्याने वर्णिका बेशुद्ध झाली आहे, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्णिकाचे वडिल सुधीर मलिक हे उत्तर प्रदेश पोलिस दलात पोलिस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहेत. 

या आधीही केला होता हल्ला

दरम्यान, पिटबुलच्या त्रासाला परिसरातील इतर लोकही वैतागले आहेत. कॉलनीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच, कारवाईचीही मागणी केली आहे. कॉलनीतील रहिवाशांच्या माहितीनुसार, याआधीही या कुत्र्याने अनेकांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे. पोलिस सध्या त्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. 

१२ दिवसांत दुसरा हल्ला

दरम्यान, १८ मे रोजीही मेरठमधील खरखौदा क्षेत्रात अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. पिटबुलने ९ वर्षांच्या सूफियानवर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. पिटबुलने त्याच्या शरिरावर असंख्य चावे घेतले आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …