‘गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी…’ बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या गौतमी पाटीलची (Gautami Patil) जोरदार चर्चा आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे जणू समीकरणच झालंय. कधी राजकीय वजन दाखवण्यासाठी तर कधी लग्नाचा वाढदिवस म्हणून गौतमीचा कार्यक्रम ठेवणं ही आता फॅशनची झाली आहे. आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की तरुणाईची तुफान गर्दी ही आलीच. गौतमीची एक अदा पाहण्यासाठी जागा मिळाली नाही तर अगदी झाडावर, टॉवरवर किंवा घराच्या छतावर चढून तरुण मुलं कार्यक्रमाला गर्दी करतायत. गौतमीच्या डान्स आणि तिच्या सौंदर्याने तरुण घायाळ होतायत. आता तर पाटील आडनावावरुन वाद सुरु आहे. 

बीडच्या तरुणाकडून थेट लग्नाची मागणी
आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या कार्यक्रम किंवा आडनावामुळे नाही तर वेगळ्याच कारणाने ती चर्चेत आली आहे. बीडच्या (Beed) एका तरुणाने गौतमीला थेट लग्नाची मागणी घातलीय. (Marriage Proposal) बीडमध्ये राहाणाऱ्या या तरुणाचं नाव रोहन गलांडे-पाटील असं नाव असून तो 26 वर्षांचा आहे. रोहनने गौतमीला एक पत्र लिहिलं असून यात त्याने गौतमी तुझ्या इच्छा-अटी सर्वमान्य… बोल तू होती का माझी परी’ असं लिहिलं असून यात त्याने आपल्या घराचा देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट असं म्हटलं आहे. 

हेही वाचा :  ‘ब्रिक्स’ परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष! पण भारताचा समावेश असलेलं BRICS आहे तरी काय?

रोहनचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी इथल्या रोहन गलांडे पाटील यांनी गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटलंय, ‘गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी पण, तु होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगितलं होतंस’ असं रोहनने म्हटलं आहे. 

‘गौतमीच काय म्हणाली होती’
‘आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून ईच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे’ असं गौतमीने आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

‘तुझ्या सर्व अटी मान्य’
गौतमीची ही मुलाखत रोहनने ऐकली आणि त्याने गौतमीच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचं म्हटंलय.  ‘तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणा लग्नाला तयार नसेल, तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे. दुग्ध व्यवसाय आहे. ‘तु जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये असं सांगत रोहनने आपल्या घराचा पत्ता दिला आहे. 

हेही वाचा :  ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

वराच्या शोधत असणाऱ्या गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटीलाला भेटायला जाणार का ? आणि त्याच्यासोबत लग्न करणार का ? हा उत्सुकतेचा विषय आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …