Gautami Patilचा व्हिडीओ व्हायरल होताच रुपाली चाकणकर भडकल्या; पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश

Gautami Patil Video : सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात चर्चेत असलेल्या डान्सर गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक खासगी व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमी पाटील एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत होती. त्यावेळी चोरून तिचा व्हिडीओ काढण्यात आला. यानंतर तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गौतमीच्या समर्थनात प्रतिक्रिया देत याविषयी रोष व्यक्त केला आहे. दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसांत (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना व्हिडीओ शूट करुन काहींनी तो फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला होता. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या सर्व प्रकारानंतर पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा : ‘बाईच बाईची…’, Gautami Patil च्या व्हायरल न्यूड व्हिडीओचे सोशल मीडियावर पडसाद

हेही वाचा :  Matka Dosa चर्चेत! Video पाहून लोक विचारतायत हा डोसा खायचा कसा?

दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सायबर पोलिसांना (Cyber Police) याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा, अशाही सूचना दिली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग,  पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.  हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  पुणे पोलिसांनी पकडलेले बाईकचोर निघाले दहशतवादी, दोघांनाही अटक; 5 लाखांचं होतं बक्षीस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …