Munmun Dutta Education: जेठालालची क्रश ‘बबीता’ कितवी शिकलीय माहितेय का?

Munmun Dutta Education Details:मुनमुन दत्ता उर्फ बबिताजीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे अनेक फोटो, सिरिअलमधील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. मुनमुन दत्ता ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ रोजी दुर्गापूर, पश्चिम बंगाल, भारत येथे झाला. ‘सब टीव्ही’ शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘बबिता अय्यर’ या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. दरम्यान तिच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. मुनमुन दत्ताच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

अभिनेत्री मुनमुन दत्ताने आपले शालेय शिक्षण उत्तर प्रदेशातील कानपू येथून पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड मॉडेल सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला. तसेच उर्वरित शिक्षण तिने मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. मुनमुन दत्ताने पुण्यातून इंग्रजी विषयामध्ये मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) केले आहे.

शिक्षण अर्धवट सोडून केला अभिनय, करिना कपूर कितवी शिकली माहितेय का?

Jaggi Vasudev Education: जग्गी वासुदेव यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या
बबिताजी उर्फ मुनमुन दत्तचा जन्म पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे झाला. लहानपणी सरस्वती पूजेनिमित्त होणाऱ्या शाळेच्या कार्यक्रमात ती गाायची. तिचे वडील आणि आई दोघेही गायक होते. तिने शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. कॉलेजच्या काळात तिने फॅशन शोमध्येही भाग घेतला होता.

हेही वाचा :  सलील कुलकर्णींनी लाडक्या लेकासह 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटला दिली भेट

२००४ मध्ये आलेली हम सब बाराती ही तिची पहिली मालिका होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याच काळात गायक दलेर मेहंदीच्‍या “हमने पके ली है” या गाण्‍याचाही ती एक भाग होती. २००५ मध्ये आलेल्या ‘मुंबई एक्स्प्रेस’ आणि ‘मोर’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. २००६ च्या हॉलिडे चित्रपटातही काम केले होते, जिथे तिने शुलीची भूमिका केली होती. २००८ मध्ये, तिला सब टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करण्याची संधी मिळाली, जिथे तिने बबिता अय्यरची भूमिका केली होती. या मालिकेने ३ हजारहून अधिक भाग पूर्ण केले आहेत.

मुनमुन ही बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत टीव्ही जाहिरातींमध्येही दिसली आहे. ती अनेक आयटम साँगमध्ये दिसली आहे. निशांत आणि मिलानी अभिनीतीच्या ‘स्टुडंट’ या दक्षिण भारतीय चित्रपटातील ‘आडली नाटो ए पूटा’ हे तिचे आयटम साँग आहे.

‘आई कुठे काय करते’ मधील ‘संजना’ कितवी शिकलीय माहितेय का?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …