उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शाळा; पालकांचे सुट्टीचे बेत रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा उशिरा सुरू झाल्याने यंदा उन्हाळी सुट्ट्यांमध्येही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय अनेक शाळांच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. शाळांच्या या नियोजनामुळे पालकांचे सुट्टीचे बेत रद्द करावे लागत असल्याने अथवा त्याची फेररचना करावी लागत असल्याने उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवू नका, अशी मागणी पालक करीत आहेत. दुसरीकडे अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने शाळा सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका शाळांनी घेतली आहे.

उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्यावरून पालक आणि शाळा प्रशासनामध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वर्षी करोनामुळे शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घेण्यासाठी शाळांनी एप्रिल आणि मे महिन्यांत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये पालक आपल्या मुलांना घेऊन सहलीसाठी किंवा नातेवाइकांकडे जातात. यंदा सुट्ट्यांमध्ये शाळा सुरू राहणार असल्याने पालकांकडून त्याला विरोध होत आहे. शाळा उन्हाळ्याऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करा, अशी मागणीही पालक करीत आहेत.

हेही वाचा :  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने घेतला 'हा' निर्णय

अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, तर पुन्हा पालकच शाळेच्या शिक्षकांना दोषी ठरवतात. अशा परिस्थितीत जर एक वर्ष शाळा उन्हाळी सुट्यांमध्येही सुरू राहिली, तर पालकांनी हरकत घेण्याचे काहीच कारण नाही, असे शाळांकडून सांगण्यात येत आहे. हा वाद आता शिक्षण विभागाकडे गेला असून, यावर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत

सहावी ते बारावीपर्यंत भगवद्गीता शिकवणार

‘…तर अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही’

अनेक शाळांमध्ये पुरेसे ऑफलाइन शिक्षण झालेले नाही. ऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे शालेय प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. असे असताना अभ्यासक्रम पूर्ण न करताच थेट जूनमध्ये शाळा सुरू केल्या, तर पुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घ्यावी लागेल. त्यात आणखी दोन महिने द्यावे लागतील. त्यामुळे विद्यार्थी पुढील इयत्तेतील शिक्षण जूनऐवजी ऑगस्टनंतरच सुरू होईल आणि त्या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार नाही, अशी भीती शाळांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उन्हाळ्यात शाळांना सुट्टी राहणार की, शैक्षणिक वर्ग सुरू राहणार, याबाबत येत्या दोन दिवसांत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात येतील. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

हेही वाचा :  CBSE ने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त, हे आहे कारण

– दिनकर टेमकर, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

उन्हाळी सुट्ट्या मोठ्या असल्याने अनेक पालक आपापल्या गावाला किंवा सहलीला जातात. याच काळात मुलांना पोहणे, क्रीडाविषयक आणि इतर शिबिरांनाही पाठवले जाते. दोन वर्षे करोनामुळे ही शिबिरे झालीच नाहीत. या वर्षी शाळा महिनाभराने वाढवल्याने पालकांचे नियोजन कोलमडले आहे. शाळा सुरू ठेवायचीच असेल तर ती ‘ऐच्छिक’ असली पाहिजे.

– सुचित्रा जोशी, पालक (नाव बदलून)

पालकांचा विरोध कशामुळे?

अनेक पालक उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवायचे, या काळजीने शाळा बंद करण्याची मागणी करीत आहेत. पण ही खरेच काळजी आहे की, पालकांना सुट्टीचे बेत रद्द करावे लागणार असल्याचा मनस्ताप आहे, याचेही उत्तर शोधण्याची गरज असल्याचे काही शिक्षक, मुख्याध्यापकांकडून सांगितले जात आहे.

ऊन वाढले मात्र नगरमधील शाळांच्या वेळेचा पेच कायम!
Hijab Row: परीक्षेत न बसलेल्या विद्यार्थिनींना पुन्हा संधी मिळणार का? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …