Ahmednagar Rename: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा वाद पेटणार? अहिल्यादेवी नगर नावाला भाजप नेत्यांचाच विरोध

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादनंतर(Osmanabad) आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद पेटण्याची शक्यता आहे(Ahmednagar Rename).भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याच्या नामांतराचा तारांकित प्रश्न नागपूर अधिवेशनात उपस्थित केला होता. तर, अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याच्या मागणीला भाजप खासदार सुजय विखे पाटील(BJP MP Sujay Vikhe Patil) आणि आमदार संग्राम जगताप(MLA Sangram Jagtap) यांनी विरोध केला आहे. 

महाविकास आघाडी सरकाराच्या काळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर( Sambhajinagar) तर उस्मानाबादच नाव धाराशीव(Dharashiv) करण्यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महासभेत ठराव करून शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे. 

पण, स्थानिक नेत्यांकडून या संदर्भात कसलीही मागणी नाही, शिवाय काही नेत्यांकडून अहमदनगरच्या नामांतरालाच विरोध आहे.त्यामुळे अहिल्यादेवी नगर या नामांतरासंदर्भात महानगरपालिका आणि स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

नामांतरासह विभाजनाच्या मागणीवरुनही वाद

अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय आता जिल्हा विभाजनाकड वळला आहे. नामांतराची मागणी होण्याआधीपासूनच अहमदनगरच्या नामांतराचा वाद सुरु आहे.  नगर शहर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्ह्याच्या नामांतरापेक्षा जिल्हा विभाजन करणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिर्डी येथे पोलीस उपाधीक्षक कार्यालय झालं त्याबरोबरच श्रीरामपूर येथे आरटीओ कार्यालय करण्यात आला आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात सुधारणा करायच्या असतील तर आधी जिल्ह्याचे विभाजन केलं पाहिजे आणि नंतर नामांतराचा विषय काढला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच, जिल्हाधिकाऱ्यांनी का काढला आदेश?

तर, खासदार सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनाला कडाडून विरोध केला आहे जिल्हा विभाजन केल्याने कुठलाही वेगळा फायदा मिळणार नसून जिल्ह्यातील उत्तर भागातील प्रभावामुळे नगर जिल्ह्याला वेगळं स्थान प्राप्त होत त्यामुळे जिल्हा विभाजनाला आपला कायम विरोध असेल असं म्हटलं आहे.

क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करा अशी मगाणी तत्कालीन पालमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात अहमदनगरच्या विभाजनाच्या मागणीबाबत परस्पर विरोधी मते व्यक्त केली जात आहेत. मात्र, नामांतराच्या मद्द्याला या दोन्ही नेत्यांचा विरोध आहे. नामांतराच्या मुद्द्यावर अहमदनगरमधील स्थानिक नेत्यांचे मतभेद पहा.ला मिळत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …