40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?

Japan Moon Mission : भारता पाठोपाठ आता जपानचे यान देखील चंद्रावर पोहचणार आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. आता जपानच्या मून मिशनने भरारी घेतली आहे. जपान आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले. जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर लँंडिग करणार आहे. 

जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले आहे.  07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे  या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान अतिशय स्लिम आहे. यामुळे ते निश्चित केलेल्या जागेवर अचूक लँंडिग करेल असा दावा केला जात आहे. 

जपानचे यान यान थेट पुढच्यावर्षी चंद्रावर लँड होणार

जापनचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) तब्बल सहा महिन्यांनी म्हणजेच थेट पुढच्या वर्षी चंद्रावर लँडिंग करणार आहे. अत्यंत अचूकपणे सुनिश्चित ठिकाणी चंद्रावर लँडिंग करण्याची क्षमता जपानला सिद्ध करायची आहे. जपानचे हे SLIM लँडर वजनाला देखील खूपच हलके आहे. हे रोबोटिक लँडर आहे.  फेब्रुवारी 2024 मध्ये हे यान चंद्रावर लँडिंग करणार आहे. 

हेही वाचा :  आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं

ठरलेल्या जागेतच हे लँडर उतरणार

या यानाचे वैशिष्ट्य म्हणजे ठरलेल्या जागेतच हे लँडर उतरणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही. हे यान अचूक आणि सॉफ्ट लँडिंग करणार आहे. या यानाची संभाव्य लँडिंग साइट Mare Nectaris अशी आहे. या प्रदेशाला चंद्राचा समुद्र म्हणतात. चंद्रावरील सर्वात येथे खूप गडद अंधार असतो.  स्लिम लँडर प्रगत ऑप्टिकल आणि इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या यानासोबत असलेल्या  एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) पेलोडची निर्मिती जापान, नासा आणि यूरोपियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितरित्या केली आहे. 

मून स्नाइपर चंद्रावर नेमकं काय संशोधन करणार?

XRISM च्या मदतीने चंद्रावर वाहणाऱ्या प्लाज्मा लहरींता अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ब्रम्हांडात ताऱ्यांची निर्मिती कशी झाली. तसेच आकाशगंगा याबाबतची अनेक रहस्य उलगडणार आहेत. हे यान जास्तीत जास्त इंधनाची बचत करण्यासाठी गुरुत्वाकर्षण बलाचा अधिक वापर करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. 

भारताची चंद्रायान 3 मोहिम यशस्वी तर रशियाचा प्रयत्न असफल

14 जुलै रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. तर, 11 ऑगस्ट रोजी रशियाचे Luna-25 हे यान अवकाशात झेपावले. भारताआधी चंद्रावर यान उतरवण्याचा रशियाचा प्रयत्न होता. मात्र, लँडिंगआधीच 21 ऑगस्टला हे यान चंद्रावर क्रॅश झाले. यामुळे रशियाचे मून मिशन फेल झाले. 

हेही वाचा :  अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, गोळ्या खरेदी करण्यासाठी युरोपमध्ये झुंबड

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …