150 कोटींच्या क्लबमध्ये भूल भुलैय्या-2 झाला सामील; लवकरच 200 कोटींचा टप्पा करणार पार?

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani)यांच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाचा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट एवढा कमी वेळेत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे त्यामुळे आता लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जातोय. 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन भूल भुलैय्या-2 या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली. आत्तापर्यंत या चित्रपटानं 154.82 कोटींची कमाई केली आहे. कार्तिकनं त्याचा एक फोटोमध्ये शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ‘150 कोटींची कमाई’ 

आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 23.51 कोटींची कमाई केली. सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.75 कोटींची कमाई केली. आता पाचव्या दिवशी या चित्रपटानं 9.56 कोटींची कमाई करुन  76.27 कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होईल? याची कार्तिकचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

भूल भुलैया 2′ मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे.

हेही वाचा:

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Norovirus : ‘या’ कारणामुळे पसरतोय नोरोव्हायरस, केरळमध्ये मुलांना मिड डे मिलमधून लागण
Next ENG vs NZ : ऐतिहासिक कामगिरीनंतर जो रूट भावुक, कॅप्टनसीचा सांगितला वाईट अनुभव

Check Also

‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री निशी सिंहचं निधन; मृत्यूपूर्वी पतीकडे केली होती ही मागणी

मुंबई, 18 सप्टेंबर : ‘इश्कबाज’ आणि ‘कुबूल है’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री निशी …

फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; आज आहे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री

मुंबई, 18 सप्टेंबर : तुम्ही या गोंडस मुलीला ओळखलंत का? आज बॉलिवूडच्या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी …