World Kidney Day 2023: उन्हाळ्यात किडनीची काळजी कशी घ्याल

उन्हाळी हंगाम हा एक काळ असतो जेव्हा बरेच लोक त्यांच्या सुट्टीचा आणि बाहेर जाण्याचा आनंद घेत असतात. तथापि, हा ऋतू शरीरासाठी विशेषतः किडनीसाठी आव्हानात्मक असू शकतो. विशेषतः क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) असलेल्या लोकांसाठी अधिक महत्वाचे आहे. म्हणून, हायड्रेशनशी संबंधित सर्व आवश्यक खबरदारी घेणे आणि हायड्रेशन म्हणजे केवळ पिण्याचे पाणी नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

किडनी आणि एकूण आरोग्यासाठी काही उपाय आहेत. प्रत्येकाने उन्हाळ्यात याचा अवलंबणे आवश्यक आहे. CKD समस्या असलेल्या लोकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही अतिरिक्त पावले उचलली पाहिजेत. उन्हाळ्यात तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी डॉ. अतुल इंगळे, सल्लागार – नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, संचालक – नेफ्रोलॉजी विभाग, फोर्टीज हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी यांच्याकडून या काही टिप्स. (फोटो सौजन्य – iStock)

लिक्विड अन्नाचे सेवन करा

लिक्विड अन्नाचे सेवन करा

​स्वतःला हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे, विशेषतः उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो. म्हणून, हायड्रेशनसह आवश्यक पोषण सुनिश्चित करण्यासाठी दररोज किमान 10 ते 12 ग्लास पाण्यासह अधिक पाणी युक्त फळांचे सेवन करा.

हेही वाचा :  मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही

निरोगी आहाराचे पालन करा

निरोगी आहाराचे पालन करा

निर्जलीकरण वृद्ध लोकांमध्ये किडनीला दुखापत आणि दगड तयार होण्याचा धोका वाढवू शकतो. कोणत्याही प्रकारच्या किडनीच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहाराचे पालन केले पाहिजे. तसेच उन्हाळ्यात नेहमी संतुलित आहार घ्या.

(वाचा – तरूणांना का येतोय हृदयविकाराचा झटका, २० व्या वर्षी हृदयाची काळजी कशी घ्याल)

मीठ सेवन नियंत्रित करा

मीठ सेवन नियंत्रित करा

अतिरिक्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. म्हणून, आपल्या जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा. मिठाचे सामान्य सेवन दररोज 7 ते 10 ग्रॅम असते ते 4 ते 5 ग्रॅम पर्यंत कमी केले पाहिजे. अतिरिक्त मीठामुळे हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब किंवा सीकेडी असलेल्या रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात.

(वाचा – Weight Loss: काकडी खाण्याने वजन कमी होते का? उन्हाळ्यात असा करा काकडीचा उपयोग)

बाहेरचे खाणे टाळा

बाहेरचे खाणे टाळा

बाहेरचे अनहेल्दी अन्न खाणे टाळा. यामुळे विषबाधा, अतिसार किंवा अपचन होऊ शकते, ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. तसंच किडनीच्या संसर्गाचा धोकाही वाढू शकतो, कारण पॅक केलेल्या किंवा हवाबंद डब्यातील अन्नामध्ये साखर, मीठ, सॅच्युरेटेड फॅट्स इत्यादी जास्त असतात. त्याऐवजी ताजे शिजवलेले घरगुती अन्न खा.

हेही वाचा :  Kojagiri Pournima : हिराची हिरकणी झाली तीही कोजागिरीच्या रात्रीच...

(वाचा – Health Tips: रोज सकाळी प्याल धणे पाणी तर थायरॉईडसह अनेक आजारांवर करू शकाल मात)

स्नायूंचा अतिश्रम/अति थकवा टाळा

स्नायूंचा अतिश्रम/अति थकवा टाळा

नियमित व्यायाम करणे आणि सक्रिय जीवन जगणे आवश्यक आहे परंतु ते जास्त न करण्याचा प्रयत्न करा. स्नायूंच्या दुखापतीमुळे रॅबडोमायोलिसिस होऊ शकते, कारण स्नायूंच्या दुखापतीमुळे रक्तप्रवाहात प्रथिने गळती होऊ शकते, ज्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. स्नायूंना दुखापत होणे हे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून, अननियंत्रित वर्कआउटसह शरीरावर अतिरिक्त दबाव टाळण्याचा सल्ला दिला जातो.
धूम्रपान टाळा, नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक ओव्हर-द-काउंटर पेन किलर घेणे टाळा, ते मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकते.

काय आहेत उपाय

काय आहेत उपाय

महत्त्वाचा उपाय म्हणजे रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आणि त्यांचे नियमित निरीक्षण करणे. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची औषधे नियमितपणे घ्यावीत. सर्व सावधगिरी सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मूत्रपिंडाच्या आजाराच्या कोणत्याही चेतावणी चिन्हाकडे किंवा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • लघवी करताना जळजळ होणे
  • वारंवारता किंवा लघवीच्या रंगात कोणताही बदल
  • दुर्गंधीयुक्त लघवीची उपस्थिती
  • अशक्तपणा, एनोरेक्सिया, सहज थकवा
  • मळमळ किंवा उलट्या
  • कोरडी किंवा खाज सुटलेली त्वचा
  • कमी हिमोग्लोबिन पातळी
  • खालच्या ओटीपोटात किंवा पाठदुखी
हेही वाचा :  PCOS समस्येतून बाहेर यायचे असेल तर हे पदार्थ खावे, आयुर्वेदातील नियम

​चांगले खा, सक्रिय रहा, स्वत:च औषधोपचार करणे टाळा. या उन्हाळ्यात तुमचे मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिऊन आणि रसदार फळे खाऊन स्वतःला हायड्रेट ठेवा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …