Queen Naganika: 2 हजार वर्षांपुर्वी स्वत:च्या नावाची नाणी बनवणारी ‘ती’ विश्व शासक नागनिका होती तरी कोण?

Queen Naganika : आपल्या भारतीय संस्कृतीला मोठा इतिहास आहे. आपल्या भारताला प्राचीन संस्कृतीचा जाज्वल्य इतिहास (Ancident History of India) आहे. त्या काळातील माणसं ही कला, शास्त्र, स्थापत्यशैली, पाण्याचे नियोजन, रस्ते, शेती आणि स्वयंपाक या सगळ्यातही खूप अग्रेसर होती. आजच्या इतिहासकारांना तेव्हाची संस्कृती (Indian Culture) तसेच राहणीमान याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. आपल्यापैंकीही इतिहासाबद्दल अनेकांना उत्सुकता असते. विद्यार्थी असो वा नोकरी करणारा तरूण अथवा वयोवृद्ध माणसं आपल्यापैंकी सगळेच आपला भारतीय इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे कुठे कोणता ऐतिहासिक लघुपट, चित्रपट पाहायला मिळणार असेल किंवा पुस्तकं (Historical Film) वाचायला मिळत असेल अखवा कुठे कोणतं व्याख्यान असेल तर इतिहासप्रेमी तिथे आवर्जून भेट देतात. आता आम्ही तुम्हाला अशी एका इतिहासाची रंजक ऐकवण्यासाठी 2000 वर्षे मागे घेऊन जाणार आहोत. (who was queen naganika who face her own coins read the full article trending news in marathi)

तुम्हाला म्हणाल दोन हजार वर्षांपुर्वी नक्की असं काय होतं? तुम्हाला त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नक्की असेल. आम्ही तुम्हाला 2000 वर्षांपुर्वी स्वत:च्या नावाची नाणी पाडणाऱ्या एका कर्तृत्ववान राणी नागनिकाबद्दल (Queen Nagnika) सांगणार आहोत. त्या काळी राजकारण आणि समाजकारण फार वेगळे होते. परंतु ज्याप्रमाणे आज राजकारणात महिलांचे (Women Leadership in Politics) नेतृत्व दिसते आहे. त्याप्रमाणे कैक वर्षांपुर्वी महिलांचेही नेतृत्व असल्याचे दाखले मिळतात त्यातीलच एक होती राणी नागनिका. 

हेही वाचा :  चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई; काँग्रेस म्हणतं नेहरुंमुळे शक्य, तर भाजपच्या मते मोदींच्या नेतृत्वात...

कोण होती राणी नागनिका?

5000 वर्षांची आपली भारतीय संस्कृती आहे. या काळात पुरूषांच्या कर्तृत्वाबद्दल आपण ऐकतो पण त्यावेळी स्त्रियांनीही मोलाची कामगिरी केली होती. सातवाहनांनाबद्दल आपण अनेकदा इतिहासातून वाचले आणि ऐकले असेल. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी (Gautmiputra Satkarni) यांच्याबद्दल आपण ऐकलेच असेल. नागनिका ही सातकर्णीची पत्नी होती.

नागनिकाची ओळख ही जागतिक पहिली महिला शासक अशी केली जाते. सातवाहनांचा सुमारे 400 ते 500 वर्षांचा समद्ध इतिहास आहे. असे कळते सातवाहन यांचे लवकर निधन झाल्यानं नागनिकावर राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली. महाराष्ट्र – कर्नाटक – आंध्रप्रदेशात त्यांची सत्ता आढळते. आपल्या राज्याच्या विकासासाठी तिची कामगिरी ही मोलाची आहे. आपल्या नावाची नाणी (Naganika Coins) पाडणारी राणी अशी तिची जगात ख्याती आहे. नागनिका नावाचा एक शिलालेखही ब्राह्मी लिपीतील सापडला असल्याचे कळते. नागनिका या राणीवर अनेक इतिहास संशोधक संशोधन करताना दिसत आहेत. 

सातवाहन यांच्या संस्कृतीबद्दल मराठी मनाला तेवढीच भुरळ आहे. आत्तापर्यंत आपण सातवाहनांबद्दल अनेक माध्यमांतून माहिती ऐकली आणि वाचली असेलच. सध्या नागनिका हा विषयही चर्चिला जातो आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …