Delhi Building Collapse: एका क्षणात कोसळली 5 मजली इमारत, VIDEO पाहून थरकाप उडेल

Delhi Building Collapse: दिल्लीध्ये (Delhi) एक इमारत कोसळली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत फक्त 9 सेकंदात संपूर्ण इमारत जमीनदोस्त होताना दिसत आहे. भरदिवसा ही इमारत कोसळली असून अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नष्ट होताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भजनपुरा (Bhajanpura) परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, इमारत कोसळतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील भजनपुरा येथे बुधवारी एक इमारत अचानक कोसळली. विजय पार्कमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या दुर्घटनेत कोणातीही जीवितहानी झालेली नाही. एएनआयने इमारत कोसळतानाचा व्हिडीओ शेअर केला असून व्हायरल झाला आहे. 

इमारत कोसळल्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी अग्निशमन दलाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे इमारत कोसळणार आहे याची कोणतीही कल्पना तेथील लोकांना नव्हती. यामुळेच इमारत कोसळल्यानंतर लोकांची आरडाओरड सुरु असल्याचा आवाज ऐकू येत आहे.

या इमारतीत जीवितहानी झालेली नसली तरी शेजारची घरं आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. नेमकं किती नुकसान झालं आहे याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुर्घटनेनंतर तेथील रस्त बंद करण्यात आले असून मलबा हटवला जात आहे. 

हेही वाचा :  RBI Imposes Penalty: RBI चा मोठा झटका, महाराष्ट्रातील या बँकेला 1.25 कोटींचा दंड, यात आपले खाते नाही ना?

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झालेला नाही. याआधी 1 मार्चला दिल्लीच्या रोशनारा रोड येथे आग लागल्यानंतर चार मजली इमारत कोसळली होती. यामध्येही कोणती जीवितहानी झाली नव्हती. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर …

Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार …