मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही

मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी ही प्रक्रिया मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीतून रक्ताची गुठळी काढून टाकण्यास मदत करेल. या लेखाच्या माध्यमातून या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्ट्रोकच्या रुग्णांसाठी वेळीच हस्तक्षेप करणे फायदेशीर आहे हे लक्षात असू द्या. याबाबत डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्याकडून ही माहिती आम्ही घेतली आहे. स्ट्रोकच्या रूग्णांना या माहितीचा नक्कीच फायदा होऊ शकेल. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​स्ट्रोक नक्की कधी येतो?​

​स्ट्रोक नक्की कधी येतो?​

स्ट्रोक किंवा मेंदूचा झटका जेव्हा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो किंवा व्यत्यय येतो तेव्हा होतो. बीफास्ट (बॅलेन्स – संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ) आणि कोणत्याही गंभीर गुंतागुंतीशिवाय बरे होण्यासाठी स्ट्रोकच्या गोल्डन अव्हरमध्ये उपचार घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  पोटाची लटकणारी चरबी जाळून मिळवायचंय सपाट पोट व आकर्षक फिगर? मीठ खाताना करा हे काम व बघा कमाल

​स्ट्रोकमुळे मृत्युच्या प्रमाणात वाढ​

​स्ट्रोकमुळे मृत्युच्या प्रमाणात वाढ​

सध्या देशात स्ट्रोकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पक्षाघाताचा झटका सामान्यतः वृद्धांमध्ये दिसून येतो परंतु तरुणांनाही त्याचा त्रास होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. शिवाय, यामुळे जगभरात मृत्यू दर वाढू वाढला आहे. स्ट्रोकमधून बरे होण्यासाठी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी उपयुक्त ठरू शकते.

(वाचा -जमिनीवर बसून जेवण्याचे आहेत Weight loss सह जबरदस्त फायदे, डायनिंग टेबलजवळ बसणं ठरतंय घातक)

​स्ट्रोकमुळे रुग्णाच्या गतिशीलतेवर परिणाम होऊ शकतो​

​स्ट्रोकमुळे रुग्णाच्या गतिशीलतेवर परिणाम होऊ शकतो​

ब्रेन स्ट्रोक सारखी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास, 4.5 तासांच्या आत आयव्ही थ्रोम्बोलिसिस नंतर मोठ्या धमनीच्या अडथळ्यामध्ये किंवा अलीकडील शस्त्रक्रियेमुळे तसेच विंडो पिरियडच्या नंतरच्या परिस्थितीमुळे टीपीएची निवड करता येत नाही. मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी हा एक सुरक्षित पर्याय आहे. डॉक्टरांकडूनही या पर्यायाला प्राधान्य दिले जात आहे.

(वाचा – दुधात भिजवा काजू आणि मिळवा अफलातून फायदे, ऐकाल तर व्हाल हैराण)

​मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी सुरक्षित पर्याय​

​मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी सुरक्षित पर्याय​

मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या धमन्यांमधील गुठळ्या काढून टाकून मेंदूच्या स्ट्रोकचे व्यवस्थापन करण्यासाठी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी हा सर्वात सुरक्षित असा पर्याय आहे. अशा प्रकारे, ही प्रक्रिया तीव्र इस्केमिक स्ट्रोक असलेल्या रूग्णांसाठी उपयुक्त आहे, कारण मेंदूला रक्तपुरवठा आवश्यकतेनुसार होत नाही. फॅट्स किंवा प्लेकमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या अरुंद होतात.

हेही वाचा :  Viral Photo : व्हायरल झालेला 86 वर्ष जुना फोटो सगळेच होत आहेत हैराण परेशान; असं आहे तरी काय यात?

(वाचा – रोज सकाळी भिजवलेले खजूर आरोग्यासाठी ठरतात वरदान, हृदयरोग ते बद्धकोष्ठता आजारांवर गुणकारी)

​सिटी स्कॅन वा MRI ची घ्या मदत ​

-mri-

सिटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनसारख्या निदान तंत्रांमुळे धमनीच्या अडथळ्याबद्दल जाणून घेण्यास मदत होऊ शकते आणि त्यानंतरच डॉक्टर हे ठरवू शकतील की रुग्ण मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसाठी योग्य आहे की नाही. चांगल्या परिणामांसाठी यांत्रिक थ्रोम्बेक्टॉमी समोरच्या धमन्यांमध्ये स्ट्रोक आल्यानंतर 6 तासांच्या आत आणि मेंदूच्या मागच्या रक्तवाहिन्यांमध्ये 12 तासांपर्यंत केली पाहिजे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये ते 24 तासांपर्यंत केले जाऊ शकते. या प्रक्रियेचा अर्थ रिकॅनलायझेशन म्हणतात. यात सामान्य रक्त प्रवाह पुनर्संचयित करणे जे मांडीचा सांधा किंवा मनगटाच्या धमन्यांद्वारे केले जाते.

​शस्त्रक्रियेचा परिणाम होतो तात्काळ​

​शस्त्रक्रियेचा परिणाम होतो तात्काळ​

या प्रक्रियेदरम्यान, एस्पिरेशन कॅथेटर किंवा स्टेंट रिट्रीव्हर किंवा काहीवेळा दोन्ही अडथळ्यांच्या ठिकाणी प्रगत केले जातात. स्टेंट गुठळ्याच्या पुढे जातो की नाही हे तपासण्यासाठी, गुठळी साफ करते आणि रक्त प्रवाह पुन्हा सुरू होतो का हे तपासण्यासाठी एक्स-रे इमेजिंग वापरली जाते. एखाद्या कुशल तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी रुग्णालये सुसज्ज असावीत. या शस्त्रक्रियेचा परिणाम तात्काळ होतो आणि अनेक रुग्णांना या प्रक्रियेनंतर अपंगत्वाचा सामना करावा लागत नाही.

हेही वाचा :  एक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …