ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार जाहीर

Rishab Shetty: अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) त्याच्या कांतारा (Kantara) या चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ऋषभनं केलं. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारके ही माहिती दिली आहे. 

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा हा 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईमधील ताज लँड एंड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यात ऋषभला मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर  या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अनेक कलाकारांना सन्मानित केलं जातं. 2019 मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केजीएफ फेम अभिनेता यशला सन्मानित करण्यात आलं. तर 2020 मध्ये अभिनेता किच्चा सुदिपला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

हेही वाचा :  Shraddha Kapoor : इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोअर्स!

ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

काही दिवसांपूर्वी ऋषभ शेट्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करुन त्यानं लिहिलं, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी ठरली.  भारताला नवी दिशा देण्यासाठी मनोरंजन उद्योगाचे योगदान आणि प्रगतीशील कर्नाटक या विषयांवर चर्चा केली. #BuildingABetterIndia मध्ये योगदान दिल्याचा अभिमान आहे. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आम्हाला प्रेरणा देते.’

कांताराला ठरला हिट 

कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटामध्ये ऋषभबरोबरच  अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

केजीएफ मधील यश आणि कांतारा फेम ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; शेअर केले फोटो

 

 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …