Weight Loss Journey : 102 किलोमुळे आरशात बघणंही नकोसं व्हायच, 50 दिवसांत 11 किलो वजन घटवलं, एक बदल आला कामी

लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठीच कठीण होता. काहींनी आपल्या जवळच्यांना गमावलं तर काहींच्या आरोग्यावर बेतलं. असंच काहीसं ३८ वर्षीय व्यक्तीसोबत झालं. लॉकडाऊनच्या काळात या व्यक्तीने १०२ किलोचा वजनाचा आकडा गाठला. या वजनाने हैराण झालेल्या व्यक्तीसमोर काय करावं हा यक्षप्रश्न होता. अगदी महिनोंमहिने ती व्यक्ती स्वतःला आरशात देखील पाहायचा नाही. ही गोष्ट आहे गुजरतच्या कच्छमधील गांधीधाम शहरातील ३८ वर्षीय इंदरची आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन दरम्यान त्याचे वजन 102 किलोवर गेले होते. एवढ्या वजनाने सर्व बाजूंनी पसरलेले शरीर इंदर स्वतः पाहू शकत नव्हता. त्यामुळे अनेक महिने आरशात पूर्ण शरीर देखील पाहणे बंद केले. जेव्हा त्याने लोकांना त्याच्या 5 किलोमीटर वॉकथॉनबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेने इंदरला वजन कमी करण्याची गरज जाणवली. यानंतर इंदरने 50 दिवसांत 11 किलो वजन कमी केला. इंदरची फॅट टू फिट ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी कशी होती ते जाणून घेऊया.

नाव- इंदर रामचंदानी
व्यवसाय- खाजगी कर्मचारी
वय- 38
शहर- गांधीधाम, कच्छ
सर्वाधिक नोंदवलेले वजन – 102 किलो
किती वजन कमी केले आहे – 11 किलो
वजन कमी करण्यासाठी लागणारा वेळ – 50 दिवस
(फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

​टर्निंग पॉईंट कसा आला

इंदर सांगतात की, मी माझ्या पत्नीसोबत ५ किमीच्या वॉकथॉनमध्ये भाग घेतला होता. माझ्या पत्नीने तिच्या एका मित्राला याबद्दल सांगितले आणि मी 5 किमी चाललो हे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले. या प्रतिक्रियेने मला माझ्या वजनाबद्दल विचार करायला लावला. मला माहित होते की, लॉकडाऊन दरम्यान माझे खूप वजन वाढले. पण माझे वजन इतके वाढले कधी याची मला जाणीवच झाली नाही. मी घरी परतलो आणि 5 किमी चालणे पूर्ण केले. मी ठरवले की या 50 दिवसांत मला माझी शारीरिक स्थिती बदलायची आहे.

(वाचा – रक्तात ‘हे’ प्रोटीन वाढल्यामुळे पुरुषांना होतो Prostate Cancer, शरीरातल्या या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका)

​असा होता डाएट

1. नाश्ता

उकडलेले अंडे/पोहे/इडली, १ कप दूध

2. दुपारचे जेवण

२ पोळ्या, १ भाजी, डाळ-भात

3 रात्रीचे जेवण – N/A

4. व्यायामापूर्वीचे जेवण – N/A

5. व्यायामानंतर जेवण – N/A

6.कमी कॅलरी रेसिपी – N/A

(वाचा – ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल)

​कसरत आणि फिटनेसचे रहस्य

इंदर सांगतो की, माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासात मी गहू/तेल/साखर/तांदूळ/कोल्ड ड्रिंक्स सोडले होते. याशिवाय मी बहुतेक उकडलेल्या भाज्या, अंडी आणि सॅलड खात होता. यासोबत मी चालत असे. कारण वाढतं वय आणि लठ्ठपणामुळे शरीराला होणाऱ्या त्रासावर माझ्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता.

हेही वाचा :  काय आहे 16/8 intermittent fasting Diet Plan? 8 महिन्यात तब्बल 40 किलो वजन घटवलं

(वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

​जास्त वजनामुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले?

या प्रश्नाचे उत्तर देताना इंदर सांगतो की, इतर लोक तुमच्या लठ्ठपणाची जितकी खिल्ली उडवतात, तितकेच तुम्हाला शरीराबद्दल वाईट वाटत असते. लठ्ठपणामुळे खेळ नीट खेळता येत नाही, कपडे बसत नाहीत आणि आवडत्या आकाराचे कपडेही दुकानात मिळत नाहीत. आंघोळीनंतर आरशासमोर तुमचे नग्न शरीर हे तुमच्या लठ्ठपणाची आणि आळशीपणाची सतत आठवण करून देते. यामुळे अनेकदा मी स्वतःला आरशातही पाहू शकत नाही.

(वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

​स्वतःला कशी प्रेरणा दिली

इंदर सांगतो की 20 व्या वर्षीही त्याने वजन कमी केले होते. जे यावेळी वजन कमी करण्याच्या प्रवासात प्रेरणा ठरले. मला माहित होते की मी ते पुन्हा करू शकतो. तसेच माझी पत्नी माझी फिटनेस इन्स्ट्रक्टर बनली आणि मला रोज सकाळी एरोबिक्स आणि योगासने करायला लावली.

(वाचा – High Blood Sugar आणि Weight Loss पाठोपाठ ‘हा’ जीवघेणा कॅन्सर दार ठोठावतोय! या दोन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

​लाइफस्टाइलमध्ये केला मोठा बदल

वजन कमी करण्यासाठी मी रात्रीचे जेवण केले नाही. याशिवाय मी साखर आणि मिठाई टाळू लागलो. तसेच दररोज 10,000 पावले चालायचे.

हेही वाचा :  Weight Loss Story : २५ वर्षातच जडला टाईप२ चा डायबिटिस, तब्बल २ महिन्यात घटवलं १० किलो वजन

(वाचा – Cirrhosis Symptoms : सायलेंट किलर आहे Liver चा हा आजार, लास्ट स्टेजमध्ये दिसतात लक्षणे, तात्काळ सोडा ही ५ कामे)

​या प्रवासातून काय शिकायला मिळालं

इंदर सांगतो की, वजन कमी करण्याचा प्रवास दोनदा केल्यावर मला कळले की जादूचा आहार किंवा व्यायाम असे काहीही नाही. कोणतीही सबब न लावता पूर्ण समर्पणाने सतत एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टी पूर्ण होतात. वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला फक्त त्या सवयी निवडायच्या आहेत ज्या तुम्ही आयुष्यभर करू शकता.

(वाचा – काय आहे ABCG ज्यूस? Madhuri Dixitचे पती डॉ.श्रीराम नेने म्हणतात, व्हिटॅमिनने परिपूर्ण ज्यूस, जाणून घ्या फायदे))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोण) त्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …