विषासारखं घातक होईल नातं, या 5 गोष्टी सांगतील किती ‘टॉक्सिक’ आहे तुमचं नातं

कोणतेही नाते आदर आणि प्रेमामुळे टिकते. जेव्हा एकमेकांबद्दल प्रेम,आदर, आपलेपणाची भावना असते तेव्हा ते नाते जास्त काळ टिकते. कधीकधी जोडीदार एकमेकांवर ओरडत राहतात, प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडतात. वैवाहिक जीवनात अशा गोष्टी वारंवार घडू लागल्या तर समजून घ्या की तुमचे नाते टॉक्सिक झाले आहे असो म्हणतात. अशा नात्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी, भावनिक बंध यांचा अभाव असतो. तुमच्या नात्यातील कटुतेची जागा प्रेमाने घेतली आहे का आणि नाते टॉक्सिक झाले आहे का हे जाणून घ्यायचे असेल तर या गोष्टींमधून ओळखा. यामुळे तुम्ही तुमच्या नात्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला कळू शकते.
(फोटो सौजन्य : Pexels, टाईम्स ऑफ इंडिया)

​टॉक्सिक रिलेशन म्हणजे काय ?

प्रत्येक नातं वेगळं असतं. अनेक जणांना जोडीदारासोबत नाते तयार करताना अनेक अडचणी येतात. पण कधी कधी नाती इतकी बिघडतात की जीवनात विष परवतात. असे संबंध टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या नात्यात राहत असाल तर त्याचा परिणाम तुमच्यावर खूप वाईट होईल. अशा नात्याला टॉक्सिक रिलेशन म्हणतात. या नात्यात प्रेमाऐवजी दिखावा, कटुता, खोटेपणा अशा गोष्टींचा समावेश होतो. अशा नात्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी, भावनिक बंध अजिबात नसतात.

(वाचा :- मूल झाल्यावर आयुष्यातील रोमान्स गायब झालाय? मग नात्याला द्या असा तडका, जुने प्रेम पुन्हा नव्याने मिळेल)

​जेव्हा जोडीदार ओरडून बोलू लागतो

जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांशी प्रेमाने नव्हे तर ओरडून बोलू लागतो, तेव्हा त्याला टॉक्सिक संवाद म्हणतात. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण, भांडण होत असेल तर ते टॉक्सिक नातेसंबंधाचे लक्षण आहे. त्यामुळे जोडीदाराशी प्रेमाने वागण्याच प्रयत्न करा.

(वाचा :- पतीची फसवणूक केल्याची 5 महिलांनी स्वत: दिली कबुली, कारणं ऐकून अंगावर सर्रकन काटा येईल)

​जोडीदाराच्या यशात वाईट तर वाटत नाही ना ?

तुमच्या जोडीदाराचे यश पाहून तुम्हाला मत्सर वाटत असेल तर हे टॉक्सिक नात्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला तुमचे नाते सुदृढ राहायचे असेल तर तुमच्या जोडीदाराचे यश पाहून मत्सर करू नका. त्याचा आनंदात आनंदी व्हा.

(वाचा :- ही आहेत फसवणूक करणाऱ्या जोडीदाराची लक्षणे, या मार्गांनी ओळखा तुमचा जोडीदार कसा आहे)

​नकारात्मक भावना नको

एकमेकांना कोणत्याही कामात, त्यांच्या बोलण्यात, विचारात साथ दिली नाही तर नातं बिघडतं. तुम्ही लोकांनी शांतपणे बसून बोला आणि तुमच्या नात्यात अशी नकारात्मक भावना कुठे आणि का येत आहे याचा विचार करा. कधी कधी आधार नसल्यामुळे बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला एकटेपणा जाणवू लागतो. या गोष्टीचा परिणाम माणसाच्या तब्बेतीवर सुद्धा होत असतो. त्यामुळे नात्यात नकारात्मक विचार करु नका.

(वाचा :- ब्रेकअपनंतरही एक्सची आठवणीने असह्य त्रास होतोय?, जाणून घ्या यातून वेदनेतून कसं बाहेर पडावं)

​नात्यात फसवणूक

जर तुमचा पार्टनर रिलेशनशिपमध्ये तुमची फसवणूक करत असेल तर समजून घ्या की हे नाते संपत चालेले आहे हे समजून जा. कोणासोबत फोनवर बोलत असेल, जर तुम्ही हे सर्व लपवू लागलात तर समजून घ्या की जोडीदार नातेसंबंधात प्रामाणिक नाही. तो दुसऱ्यासाठी तुमची फसवणूक करत आहे. असे नाते फार काळ टिकत नाही.

(वाचा :- नोकरदार महिलांचे लग्न कसे टिकते? सुधा मूर्ती यांनी यशस्वी स्त्रियांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे सांगितले रहस्य)

​एकमेकांकडे दुर्लक्ष

रिलेशनशिपमध्ये असूनही जर तुम्ही दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करू लागले तर समजून घ्या नात्यात प्रेम नाही. अशा नात्यापासून वेगळे होऊन नवीन आयुष्य सुरू केले पाहिजे. जर एखादी व्यक्ती बोलण्यात तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि दुर्लक्ष करत असेल तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- प्रेमासाठी वाट्टेल ते! राणी एलिझाबेथसाठी प्रिन्स फिलिपने सोडला होता राजपाट… या लव्हस्टोरीतून तुम्ही काय शिकणार?)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – …

करिनाच्या सुंदर सौंदर्याचं रहस्य उघड, ऋजुता दिवेकरांनी सांगितले ‘हे’ घरगुती उपाय

बॉलिवूडच्या सर्व सुंदर अभिनेत्रींनी पैकी एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. पण बेबोच्या सदैव चमकणाऱ्या त्वचेमागे …