अनुष्का शर्माने विराटसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत अनुष्कानं विराटला मीस करत असल्याचं सांगितलं आहे. ‘जेव्हा तुम्ही या ठिकाणी किंवा हॉटेलच्या बायो-बबलमध्ये या व्यक्तीसोबत असता तेव्हा जग अधिक रोमांचक, मजेदार आणि सुंदर दिसते.’, असं लक्षवेधी कॅप्शन अनुष्कानं शेअर केलं आहे.यासोबतच हॅशटॅगमध्ये लिहिले – मिसिंग हबी पोस्ट.
अनुष्का शर्मा सध्या ‘चकडा एक्सप्रेस’च्या शूटिंगच्या निमित्ताने यूकेमध्ये आहे. विराटपासूनचं अंतर अनुष्काला सहन होत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ती विराटला खूप मीस करत आहे. विराट कोहली सध्या मोहालीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तो पंजाबमध्ये पोहोचला आहे.
हेही वाचा – PHOTO: साऊथची स्टार नयनताराने बुर्ज खलिफाजवळ सेलिब्रेट केला पतीचा बर्थडे, दिलं खास सरप्राईज
दरम्यान, अनुष्काच्या या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. विराटनेही या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेेंटचा पाऊस होत आहे.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या