हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते. दर महिन्याला दोन एकादशी असतात. माघ महिना सुरु असून माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी २७ फेब्रुवारीला येत आहे. या एका एकादशील विजया एकादशी किंवा भागवत एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास मनुष्याला प्रत्येक कामात विजय प्राप्त होतो. यासोबतच शत्रूंवर विजय मिळवता येतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
विजया एकादशी २०२२ तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त: हिंदू पंचांगानुसार विजया एकादशीचे व्रत यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी तिथी शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३९ पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१२ पर्यंत चालेल. याशिवाय विजया एकादशी तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योगही तयार होत आहेत. विजया एकादशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी १२.११ ते १२.५७ पर्यंत असेल. दुसरीकडे या दिवशी राहुकाल संध्याकाळी ०४.५३ ते संध्याकाळी ०६.१९ पर्यंत असेल.
पूजेसाठी वेदी बनवून त्यावर सात प्रकारचे धान्य ठेवावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवा आणि आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी सजवा. वेदी तयार केल्यानंतर, भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर श्रीहरीला पिवळी फुले, हंगामी फळे, तुळस इत्यादी अर्पण करा आणि धूप-दीप लावून त्यांची आरती करा. शक्य असल्यास या दिवशी तुपाचा अखंड दिवा लावावा. एकादशी व्रताची कथा वाचायला विसरू नका.
Astrology: व्यक्तीच्या कुंडलीत महादशेचा क्रम कसा असतो, किती वर्ष असतो प्रभाव, जाणून घ्या
विजया एकादशी व्रताची पद्धत:
- या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा करावी.
- पूजेत फळे व फुले, गंगाजल, धूप, दिवे व प्रसाद इत्यादींचा वापर करावा. या व्रतामध्ये दिवसभर उपवास करावा लागतो. जर तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही वेळी फळ घेऊ शकता. या उपवासात फळांचे रस देखील घेऊ शकते.
- एकादशी तिथीला भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच द्वादशी तिथीला पुन्हा विष्णूची पूजा करावी. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन करून दान द्यावे व उपवास सोडावा.
The post Vijaya Ekadashi 2022: विजया एकादशीचं महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या appeared first on Loksatta.