Video : अभीच्या एका निर्णयानं देशमुख कुटुंबाला धक्का, संजनानं व्यक्त केली वेगळीच शंका

मुंबई :आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीच्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालं. आशुतोष, नितीन, यश, ईशा, अनघा सगळ्यांनीच आनंद घेतला. फक्त अनिरुद्ध आणि अभी तिथे मनाविरुद्ध आले होते. विसर्जनालाही सगळे जण उपस्थित होते. अनघा अरुंधतीच्या घरी गेल्यामुळे अभी नाराज झाला. तू आता घरी येऊच नकोस, असं रागानं तो म्हणाला. यावर अनिरुद्धनं त्याला बरं झालं आवाज चढवलास असं म्हणून प्रोत्साहनच दिलं.

नवा गडी नवं राज्य: आनंदी मुलांना शिकवतेय रामरक्षा, अस्वस्थ झाली रमा

आता पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अभी अनघाशी कशा पद्धतीनं वागलाय, हे देशमुख कुटुंबाला कळलंय. सगळ्यांनाच धक्का बसलाय. अविनाश अभीला समजवण्याचा प्रयत्न करतोय, तर अनिरुद्ध अभीनं योग्यच केलं, असं म्हणतोय. यावर संजना म्हणते, अभीच्या आयुष्यात दुसरी संजना नाही ना? यावर अभी काय उत्तर देतो, ते कळेलंच.

त्याच व्हिडिओत आशुतोष आणि अरुंधती आपापल्या घरी एकमेकांबद्दल विचार करताना दाखवले आहेत. अरुंधतीला आशुतोषच्या मनातलं कळलंय. ती विचार करतेय, नातं बदललं की माणूस बदलतो का? आशुतोष नवरा झाला तर तो बदलेल का? अरुंधती संभ्रमात आहे.

रणवीरचा न्यूड फोटोशूटवर खुलासा, म्हणे- फोटो तर मॉर्फ केला

तर दुसरीकडे आशुतोषही अरुंधतीचा विचार करतोय. तो म्हणतो, मला फक्त अरुंधती आजूबाजूला असली की छान वाटतं. आता दोघं लग्न करणार का, हे पुढच्या भागात कळेलंच. नितीन आशुतोषला म्हणतोय, अरुंधतीला जे आतापर्यंत मिळालं नाही, ते आता मिळतंय. मग तुला का नाही मिळो? त्यावर आशुतोष मला काय नाही मिळालंय, असं विचारतो. नितीन म्हणतो, प्रेम. आता अरुंधती आणि आशुतोषमध्ये खरोखर प्रेम फुलणार का?

तु मेरे दिल मे रहने के लायक नही, राखी सावंतची आदिलवर मिश्किल टीप्पणी



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; व्हायरल झाल्या लिंक

मुंबई, 15  सप्टेंबर- भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या दमदार अभिनयासोबतच आपल्या दमदार आवाजासाठीही ओळखली जाते. …

चंदन आणि कपिलमध्ये खरंच झालाय वाद? चंदूने सांगितलं शो सोडण्याचं कारण

मुंबई, 15  सप्टेंबर-  ‘द कपिल शर्मा शो’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. या …