व्हेरिकोज वेन्सची वाढती समस्या ठरतेय डोकेदुखी! कारणे, लक्षणे आणि कशी घ्यावी काळजी

व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय? ही समस्या नक्की काय आहे आणि Varicose Veins ची काळजी घेण्याासाठी काय करायला हवे याची माहिती गरजेची आहे. सध्या अनेकांना व्हेरिकोज वेन्सची समस्या भेडसावते. एखाद्या विशिष्ट वयानंतर ही समस्या वाढीला लागते. पण म्हणजे नक्की काय होते आणि कशा पद्धतीने ही समस्या हाताळावी याबाबत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. व्हेरिकोज वेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये रक्त एकाच ठिकाणी जमा होते. यामुळे आपल्या शिरा फुगतात आणि पायात प्रचंड वेदना निर्माण होते. ही समस्या जास्त वेळ उभं राहून काम करणाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

व्हेरिकोज वेन्स होण्याची कारणे काय आहेत?

आता बदलत्या लाइफस्टाइलमुळे साधारण चाळीशीतच अनेकांना व्हेरिकोज वेन्सच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. हा त्रास नक्की का होतो आणि याची मूळ कारणे काय आहेत जाणून घेऊया.

  • लठ्ठपणा
  • गरोदरपणात महिलांना जास्त वजनामुळे
  • कौटुंबिक अनुवंशिकता असेल तर
  • सतत धुम्रपान केल्यास
  • व्यायामाची कमतरता
  • उंच टाचांच्या चपलांचा वापर अर्थात हाय हिल्सचा वापर
  • जास्त मिठाचे अन्नपदार्थ सेवन केल्यास
  • सतत उभं राहून काम केल्यास अथवा सतत बसून राहिल्यास
हेही वाचा :  'टेस्ला'च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, 'इंजिनिअरला...'

वास्तविक जेव्हा अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा योग्य पद्धतीने कार्य करत नाहीत तेव्हा ही समस्या निर्माण होते. रक्तवाहिन्यांमधील असणारी झडप ही योग्य पद्धतीने काम करणे बंद करते आणि रक्त हृदयाकडे न जाता आपल्या शिरांमध्ये जमा व्हायला लागते तेव्हा हा त्रास पायांच्या शिरांवर अधिक झालेला दिसून येतो. व्हेरीकोज वेन्स सहसा पायांवरच दिसून येतात.

(वाचा – यकृतामधील घाणेरड्या फॅटला एका झटक्यात खेचून काढेल ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, फक्त कसा घ्यायचा ते पाहा)

व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे कसे ओळखावे?

व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत असेल तर या त्रासाची नक्की लक्षणे कोणती आहेत हे सर्वात आधी जाणून घेतले तर काळजी घेणे अधिक सोपे जाईल. काय आहे व्हेरिकोज वेन्सची लक्षणे –

  • अशुद्ध रक्त साचून राहिल्याने शिरा फुगीर दिसतात आणि काळ्यानिळ्या दिसू लागतात
  • शिरांमध्ये रक्त जमा होते आणि गाठी तयार होतात आणि शिरांच्या ठिकाणी सूज येते
  • उभं पाहिल्यावर पाय दुखायला लागतात
  • तसंच शिरा सुजल्यावर खाज येते, पाय दुखते आणि पायावर सूज दिसणे अशी लक्षणे दिसतात
  • शिरा अतिप्रमाणात फुगल्या तर रक्तस्रावही होतो आणि जखम होऊन व्हेरिकोज अल्सर होण्याची शक्यता असते
हेही वाचा :  भारतातील पहिला ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमधील ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News

(वाचा – Foods Bad for Intestines:आतड्यांना आतून खराब करतात हे पदार्थ या ‘साइलेंट किलर’ पासून लांबच राहा)

व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत असेल तर अशी घ्या काळजी

  • आहारात कमीत कमी मीठाचा वापर करावा
  • वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे
  • रोज सकाळी नियमित फिरायला जा. मॉर्निंग वॉक करून पायाचा व्यायाम करावा. पायाला स्ट्रेचिंग करावे, जेणेकरून शिरा फुगणार नाहीत
  • एकाच जागेवर जास्त वेळ बसणे अथवा उभं राहणे शक्यतो टाळा. यामुळे पायांच्या शिरांवर अधिक ताण येतो आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास निर्माण होतो
  • सिगारेट पिणे अथवा मद्यपान करणे या गोष्टी टाळा
  • बुटांमध्ये सॉक्सचा वापर करण्याची सवय करा
  • झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपा. यामुळे पायाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो
  • हाय हिल्स घालणे टाळा. हाय हिल्स घातलेच तरी त्यावर तासनतास उभे राहू नका

आपल्या नियमित जीवनशैलीमध्ये ही काळजी घेतली आणि काही बदल केले तर व्हेरिकोज वेन्सच्या आजारावर मात करणे सोपे होते. तसंच ही समस्या अधिक गंभीर होत आहे असं जाणवायला लागलं तर वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा :  Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकाद आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

(वाचा – ५ सवयी कमी केल्यास होईल वजन कमी, वेळीच घ्या जाणून नाहीतर होईल नुकसान!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …