Viral News: ‘कोणी घरी नाही, लवकर ये’, बोलवल्यानंतर गेल्याने बॉयफ्रेडला प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले

Boyfriend Beating: एक धक्कादयक घटना समोर आली आहे.  प्रेमात पडलेल्या  उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा (Banda) येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खरं तर, एका तरुणाला मैत्रीणीने घरी बोलावले होते. तो घरात जात असताना मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याचे तरुणीवर प्रेम असून त्यानेच तिला आपल्या घरी बोलावून घरी कोणी नाही, ये, असे सांगितले होते. मात्र तेथे गेल्यावर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. मुलीचे कुटुंबीय बाहेर गेले नव्हते. ते घरीच होते.  

मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केली. मुलाने सांगितले की, त्याला रात्री त्याच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हणाली की घरी कोणी नाही, तू घरी ये. यानंतर जेव्हा तो मुलीच्या घरी पोहोचला आणि घरात प्रवेश करत असताना मुलीच्या भावांनी त्याला चोर समजून पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.

तरुणाने घडलेला प्रकार सांगितला

मात्र, मारहाण झाल्यामुळे आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि त्यांनी हा वाद कसातरी मिटवला. यानंतर तरुणाने सगळा प्रकार सांगितला की, तो कोण होता, तो तिथे का आला होता आणि त्याला कोणी बोलावले होते?

हेही वाचा :  भरधाव वाहनं धावत असताना रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला; पुढे काय झालं पाहा

मैत्रिणीसाठी तरुणाने आणले होते गिफ्ट 

तरुणाने सांगितले की, त्याला त्याच्या मैत्रिणीला घड्याळ द्यायचे होते. त्याने तिच्यासाठी घड्याळही आणले. मात्र जेव्हा तो प्रेयसीच्या घराच्या दारात पोहोचला आणि घरात प्रवेश करु लागला तेव्हा त्याला बेदम मारहाण करण्यात आली. प्रेयसीने त्याला खोटी माहिती का दिली, हे अजूनही मुलाला समजले नाही?

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मारहाणीनंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाची प्रकृती आता धोक्याच्याबाहेर आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …