Breaking News
  • Boyfriendसोबतचे ‘ते’ चॅट लहान बहिणीने दाखवलं घरी, जे घडलं त्याने उडाला थरकाप
  • Central Government : केंद्र सरकार दरमहा देणार 3 हजार रुपये, जाणून घ्या
  • दिवाळीच्या आधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता, हालचालींना वेग
  • Indian Hotels For Adults: भारतातील या हॉटेल्समध्ये जोडप्यांना परवानगी, मुलांच्या प्रवेशावर बंदी
  • “मला माफ कर आई, जिमला जाणं माझ्या…”; तरुणीने संपवलं जीवन

उदित नारायण यांना आला हार्ट अटॅक? चाहते चिंतेत तर मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अनेक असे रिपोर्ट्स समोर आले आहेत. समोर आलेल्या बातमीने चाहते मोठ्या चिंतेत आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या या गायकाची तब्येत जाणून घ्यायची आहे. पण या बातमीमागे काय सत्यता आहे, घेऊया जाणून.

उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितलं सत्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या धक्कादायक वृत्तानंतर उदित यांच्या मॅनेजरने यामागचं सत्य सांगितलं आहे. हे वृत्त पूर्णपणे खोटं (Udit Narayan Heart Attack Fake News) आहे. उदित यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. उदित यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त त्यांच्या मॅनेजरने फेटाळले आहे. ते पूर्णपणे ठीक असल्याचे आणि त्यांना काहीही न झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे वाचा-राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका कॉमेडियनचे निधन; विनोदविश्वाला मोठा झटका

मीडिया रिपोर्टनुसार बुधवारी रात्रीच उदित आणि त्यांच्या मॅनेजरची बातचीत झाली. ट्विटरवर हार्ट अटॅकचे वृत्त ट्रेंड झाल्यामुळे गायक उदित काळजीत होते. त्यांना सातत्याने फोन कॉल्स येत होते. यामुळे ते खूपच अस्वस्थ होते.

हे वाचा-पत्नीने घटस्फोट दिल्यानंतर नैराश्यात होता अभिनेता, सहन न झाल्यानं विष प्यायला अन्…

उदित यांच्या मॅनेजरने अशी माहिती दिली की, त्यांचा असा संशय आहे की हे वृत्त नेपाळमधून पसरले आहे. कारण ज्या मोबाइल क्रमांकावरुन हा मेसेज व्हायरल झाला त्यावर नेपाळचा कोड आहे. ही बातमी कोणी पसरवली असा प्रश्न उदित नारायण यांच्या मॅनेजरला पडला आहे. पण मॅनेजरने दिलेल्या अपडेटनंतर चाहत्यांचा हा आवडता गायक एकदम ठणठणीत असल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous पाकिस्तानमधील टीकाकारांना शांत करण्यासाठी रमीझ राजा दिले विराटचे उदाहरण; पाहा काय बोलून गेले PCB अध्यक्ष…
Next 55 वर्षांच्या माधुरी दीक्षितचा पिंक साडीत जलवा, ग्लॅमरपुढे नवं घर पण पाणी कम

Check Also

“हिजड्याचा रोल विश्व सुंदरी करणार”, Taaliच्या पोस्टवरगौरी सावंतची प्रतिक्रिया

मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेत्री सुष्मिता सेनच्या नव्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. ‘ताली’ …

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची उडवली जातेय खिल्ली, भन्नाट Memes एकदा पाहाच

मुंबई: बिग बॉस मराठीचं चौथं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. या पर्वात सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे …