Breaking News

“हिजड्याचा रोल विश्व सुंदरी करणार”, Taaliच्या पोस्टवरगौरी सावंतची प्रतिक्रिया

मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेत्री सुष्मिता सेनच्या नव्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. ‘ताली’ या वेब सीरिजचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. अभिनेत्री सुष्मिता सेन पहिल्यांदा ट्रांन्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. ट्रान्सजेंडर श्रीगौरी सावंतची भूमिका सुष्मिता साकारणार आहे. गौरी सावंत ही अनेक वर्ष ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काम करत आहे. अनेक सामाजिक कार्यात तिचा सहभाग असतो. सेक्स वर्करसाठीही गौरी सावंत महत्त्वाचं काम करत आहे. जवळपास 500 हून जास्त ट्रांन्सजेंडर्सना गौरी सावंत एकत्र आणले आहेत. अशा गौरी सावंतच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची घोषणा होताच गौरीनं देखील तिचं मत व्यक्त केलं आहे.

सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या तालीचं पहिलं पोस्टर रिलीज होताच. गौरी सावंतनं आजकतशी बोलताना सांगितलं, ‘एका हिजड्याची भूमिका विश्व सुंदरी करणार आहे ही आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. सुष्मिता सेन या भूमिकेला पुरेपूर न्याय देईल असं मला वाटतं. जर कोणी मोठ्या अभिनेत्यानं माझं काम केलं असतं कर ते फार फनी वाटलं असतं’.

हेही वाचा – Taali First Look: सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत; समोर आला ‘ताली’चा फर्स्ट लुक
श्री गौरी सावतं बोलताना पुढे म्हणाली, ‘ट्रान्सजेंडच्या आयुष्यावर बायोपिक तयार होणं ही मोठी गोष्ट आहे. त्यातही अभिनेत्री सुष्मिता सेन माझी भूमिका करत आहे त्यामुळे मी घी डब्ब्यात जाऊन बसले आहे का असं मला वाटत आहे’.

गौरी सावंतची भूमिका कोण साकारणार याविषयी गौरीला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, ‘मला माझी भूमिका कोण साकारणार याविषयी कोणतीही आयडिया नव्हती. मला वाटलं कोणी तरी साऊथ अभिनेता किंवा अभिनेत्री माझी भूमिका साकारेल. कारण माझी अंगकाठी फार मुलांसारखी आहे. जेव्हा मला सुष्मिता सेनचं नाव सांगण्यात आलं तेव्हा मी फार हसले होते. मी रात्रभर हसत होते. मला सतत सुष्मिता सेनचं चुनरी चुनरी गाणं डोळ्यासमोर येत होतं.  मला खरंच आधी सुष्मिता सेन माझी भूमिका करणार यावर विश्वास बसत नव्हता. पण कॉन्ट्रॅक्स साइन केल्यावर मला विश्वास बसला’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous टी20 वर्ल्ड कपला निघण्यापूर्वी रोहित शर्माचं सिद्धिविनायकाला साकडं, फोटो व्हायरल
Next दसऱ्याला सगळीकडे उत्सवाची धामधूम, पंकज त्रिपाठींनी मात्र वेगळ्या पद्धतीनं साजरा केला सण

Check Also

बादशाहच्या आवाजाचे नमुने घ्या, कोर्टाचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदिया याला एका प्रकरणाच्या …

अवधुत गुप्ते शिंदे गटात? शिवसेना गीतामुळे झालेल्या चर्चांवर दिलं उत्तर

मुंबई, 06 ऑक्टोबर : यंदा मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले. शिवाजी पार्कात शिवसेना …