‘त्यांच्या मिठीत वडीलकीची माया,थरथर अन्..; समीर चौघुलेंनी पोस्ट चर्चेत

मुंबई, 17 सप्टेंबर-  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून विनोदी अभिनेते समीर चौघुले महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या कॉमेडीने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. समीर चौघुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत वेगवगेळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आजही त्यांनी एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समीर चौघुलेंनी नुकतंच ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या खास भेटीचा अनुभव त्यांनी पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.

समीर चौघुले पोस्ट-
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी मोहनदास काका सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेण्याचा योग आला. ९३ वर्षांच्या या तरुणाने आजवर रंगभूमीवर केलेलं कार्य, काम, किस्से प्रत्यक्ष त्यांच्या मुखी ऐकणे हे अत्यंत आनंददायी होत..मोहनकाका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” नियमित बघतात आणि त्यांना माझे काम खूप आवडते हे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आमच्या दूरध्वनी वरील संभाषणात सांगितले होते … भेटायचा योग मात्र माझ्या कार्यबाहुल्यामुळे येत नव्हता..पण एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला..”समीर…अरे ९३ वर्षांचा आहे रे मी…तुला येऊन भेटायची इच्छा खूप आहे..पण शक्य होत नाही रे”…कुठेतरी आत चर्र झालं….गेले काही महिने थोडा वेळ ही काढता न यावा इतकं ही मोठ काम मी नक्कीच करत नसल्याची जाणीव झाली…स्वतःचाच राग आला… आणि त्याच दिवशी मी मोहनकाकांना त्यांच्या अंधेरीच्या घरी जाऊन भेटून आलो…

मला भेटल्यावर मोहन काकांनी मला घट्ट मिठी मारली…त्यांच्या मिठीत वडीलकीची माया, थरथर आणि डोळ्यात आसवं होती…मला ही क्षणभर भरून आल…त्यांनी काठी टेकवत एखाद्या मोठ्या सत्कारमूर्तीचा करतात तसा शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला.. मी वाकून नमस्कार केला..मला सुरकुत्या पडलेल्या हातांनी भरभरून आशिर्वाद दिले ..मला म्हणाले “तुझं आणि माझं दैवत एकच चार्ली चॅप्लिन…तू केलेला चार्ली चॅप्लिन बघितला तेव्हापासून तुला भेटायची इच्छा होती”…..मला म्हणाले ” तू आत्ता ज्या जागेवर बसला आहेस ना त्या जागी काही वर्षांपूर्वी “वपु” बसून गेले आहेत…विंदा बसून गेले आहेत..पुल भाई बसले होते” मला काय react व्हावं तेच कळेना .पुढचा अर्धा तास मी मोहन काकांचे किस्से, त्यांच्या संगीत नाटकांच्या आठवणी, त्या काळची दैवी माणसे याबद्धल फक्त ऐकत होतो आणि साठवत होतो. फोनवर त्यांच्या ऐकलेला थकलेला आवाज त्या क्षणी गायब झाला होता….एक तुकतुकीत कांतीचा विलक्षण प्रतिभा असलेला एक तरुण माझ्या समोर मला दिसत होता..

(हे वाचा:Tu tevha tashi : अखेर सौरभसमोर उलगडणार आकाशचं सत्य;लवकरच होणार दोघांची भेट )
अनुभवाने, आपल्या कामाने पर्वताहून मोठ्या असलेले हे रंगकर्मी अत्यंत खुल्या दिलाने माझं कौतुक करत होते…सध्याच्या कठीण काळात सातत्याने हास्य फुलवण्याच काम केल्याबद्धल आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाला भरभरून आशिर्वाद देत होते….मोहन काकांना भेटून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या पिढीची आपल्या कामावर असलेली निष्ठा… आणि काकांना भेटून एक गोष्ट मी अक्षरशः लुटली ती म्हणजे…. “समाधान”..तुम्हाला कधी ही जुनेजाणते रंगकर्मी दिसले तर आवर्जून त्यांना भेटायला जा… त्यांची चौकशी करा…त्यांना किंचित nostalgic होऊ द्या…..कोणी स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …