‘तुम्हाला विश्वास बसतोय…?’; शर्टलेस होत शाल्वने चाहत्यांना विचारला एक प्रश्न

मुंबई, 16 जुलै : अभिनेता शाल्व किंजवडेकरनं (Shalva kinjawdekar) झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर  पदार्पण केले होते. अगदी अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तर मालिकेचे कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर  करून आहेत. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर  तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.  शाल्वच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे.

शाल्व किंजवडेकर याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. तो त्याचे फोटोज सोशल मीडियावर सतत शेअर करत असतो. त्याचे चाहते त्याच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट करत असतात. शाल्व चे विशेषतः मुलींमध्ये फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. अलीकडेच शाल्वने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो candid पोज देताना दिसत आहे. तसेच  तो शर्टलेस आहे. त्याने या फोटोला ‘मी जर तुम्हाला सांगितलं की हा फोटो Candid आहे तर तुमचा विश्वास बसेल का’ असं कॅप्शन दिलं आहे.  त्याच्या या फोटोवर खूप कमी वेळातच त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडलाय.  शाल्व किंजवडेकरच्या या फोटोवर विशेषतः त्याच्या फिमेल फॅन्स फिदा झाल्या आहेत.

शाल्वचा हा  फोटो विशेष आहे कारण तो शाल्वच्या वडिलांनी काढला आहे. त्याने ‘थँक्स फॉर द क्लीक बाबा’ असं म्हणत फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – Bali: मराठी मालिकांच्या सेटवर भुतांचा वावर? संजना अन् शालिनीचा भीतीने उडाला थरकाप; काय आहे प्रकरण?

शाल्व किंजवडेकर त्याच्या लव्ह लाईफमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. तसेच त्याच्या बाईक प्रेमाबद्दलही बऱ्याचदा चर्चा होते.  ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील त्याची ओम ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती. अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. या मालिकेआधी शाल्वने अनेक वेब सिरीज आणि चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. आता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेनंतर तो कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार याबद्दल त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous अन्विताला कशी मिळाली गाजलेल्या चंदाची भूमिका? अभिनेत्रीने शेअर केल्या timepass 1 च्या आठवणी
Next निया शर्मा ‘अनुपमा’फेम अभिनेत्याला करतेय डेट;’झलक दिखला जा’मध्ये दिसणार एकत्र

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक, वयाच्या ९२ व्या वर्षी फिल्ममेकरने घेतला अखेरचा श्वास

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता रणवीर शौरीच्या वडिलांचे निधन झाल्याचे (Ranvir Shorey’s Father Passes Away) वृत्त समोर …

VIDEO: गायिका आशा भोसले नातीसोबत डिनर डेटवर; अभिनेत्रींना टक्कर देते जनाई

मुंबई, 18 सप्टेंबर-   लोकप्रिय गायिका आशा भोसले या वयातही अतिशय सक्रिय असतात. आयुष्याच्या प्रत्येक लहान-लहान …