आजच्याच दिवशी सचिनने केलं होतं क्रिकेट विश्वचषकात पदार्पण, सर्वाधिक धावांमध्येही आहे अव्वल

Cricket World Cup : भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेटचा विषय निघाला की, समोर येतं ते नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावरच असून सचिनने आजच्याच दिवशी विश्वचषकात पदार्पण केलं होतं. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केल्यानंतर सचिन सर्वात आधी 1992 च्या विश्वचषकात खेळला. त्यानंतर आजवर त्याने बऱ्याच धावा केल्या. विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिनच्याच नावावर आहेत. नेमकी ही क्रमवारी कशी आहे यावर एक नजर फिरवूया…

क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा

  1. सचिन तेंडुलकर – या यादीत सर्वाधिक धावा सचिनच्याच नावावर आहेत. सचिनने 2 हजार 278 धावा विश्वचषकात केल्या आहेत. 
  2. रिकी पॉटिंग – सचिननंतर नंबर लागतो, माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉटिंगचा. रिकीने 1 हजार 743 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या आहेत.
  3.  कुमार संगकारा – श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने 1 हजार 532 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  4. ब्रायन लारा – वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने 1 हजार 225 धावा केल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.
  5. एबी डिव्हिलीयर्स – दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलीयर्सने 1 हजार 207 धावा केल्या असून तो पाचव्या क्रमांकावर आहे. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

हेही वाचा :  IND vs NZ, Toss Update : भारतानं गमावली नाणेफेक, न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …