ज्याला तुम्ही सामान्य खोकला समजता आहात तो TB तर नाही ना? या लक्षणांवरून झटक्यात ओळखा फरक.!

खोकला अर्थात cough ही सध्याच्या युगातील एक अत्यंत सामान्य समस्या बनली आहे. पण सामान्य समस्या आहे म्हणून याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने पाहण्याची देखील गरज आहे. कोरोना विषाणू, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल अशी काही कारणे आहेत ज्यामुळे खोकला अगदी सहज येऊ शकतो. Corona महामारीवेळी खोकला हे एक सामान्य लक्षण असल्यामुळे खोकल्याबाबत आता जनसामन्यांमध्ये भीती देखील निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूनंतर आता खोकल्याकडे अनेकजण गांभीर्याने पाहत आहेत. कधीकधी खोकला हे TB चे लक्षण देखील असू शकते पण त्याचे थेट निदान करता येत नाही.

तर टीबीमध्ये सतत खोकला येणे सामान्यच आहे. पण आता कोरोनानंतरही अनेकांना सतत खोकला सतावतो आहे. अशा परिस्थितीत, हे ठरवणे कठीण होते की हा खोकला नक्की टीबीमुळे येतो आहे की कोरोनामुळे आहे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आहे. सर्वप्रथम, तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की टीबीमुळे होणारा जुनाट खोकला बहुतेकदा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस संसर्गामुळे होतो तर सामान्य खोकला हा सामान्यतः श्वसनमार्गाच्या वरील भागात व्हायरल इनफेक्शन झाल्यामुळे होतो. (फोटो सौजन्य :- iStock)

टीबी आणि सामान्य खोकल्यात फरक कसा ओळखावा?

टीबी आणि सामान्य खोकल्यात फरक कसा ओळखावा?

खोकला समजून घेण्यासाठी त्याचा प्रकार आणि कालावधी समजून घेणे आवश्यक आहे. टीबी आणि इतर तीव्र श्वसन रोगांमुळे खोकला होऊ शकतो. परंतु हे देखील माहित असले पाहिजे की टीबी या आजाराची सुरुवातीची लक्षणे केवळ खोकल्याच्या रूपात दिसून येतात. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हे टीबीचे लक्षण असू शकते. जर तुमचा खोकला एवढा काळ असेल आणि तुम्हाला त्रास होत असेल तर वेळीच तुम्ही तपासणी करून घ्यायला हवी.

हेही वाचा :  मिनी हार्ट अटॅक म्हणजे काय? याकडे दुर्लक्ष करणे किती जीवावर बेतेल? लक्षणे जाणून घ्या

(वाचा :- Foods For Cholesterol: घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात शरीराबाहेर फेकलं जातं, हे 11 पदार्थ करतात रक्त शुद्ध)​

टीबी आणि सामान्य खोकल्यामधला फरक

टीबी आणि सामान्य खोकल्यामधला फरक

टीबीमध्ये तीव्र खोकला असतो जो 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो. टीबीच्या रुग्णाला टीबीची लागण झाल्याचा इतिहास असतो. टीबी बाधित रुग्णाला खोकल्यातून रक्त सुद्धा येते. शिवाय असा थकवा येतो जो काही केल्या जात नाही. या खेरीज भूक लागत नाही व त्याचा परिणाम म्हणून वजन कमी होते. अनेकदा शरीर थंड पडते व अचानक ताप येऊन रात्रीचा घाम येतो. सामान्य खोकल्यात मात्र अन्य लक्षणे दिसत नाहीत.
(वाचा :- जास्त स्ट्रेसमुळे मेंदूला जडतो हा गंभीर आजार, Board Exam 2023 च्या आधीच करा डॉक्टरांनी सांगितलेली ही 5 कामे..!)​

टीबीची कारणे

टीबीची कारणे

कमकुवत इम्यून सिस्टम, टीबी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे, अयोग्य आहार, वारंवार धूम्रपान करणे ही टीबी रोगाची काही प्रमुख कारणे आहेत. आधीच अस्तित्वात असलेले आजार जसे की क्रॉनिक किडनी डिजीज आणि इम्यूनिटी डिजीज यामुळे सुद्धा टीबी होऊ शकतो. अजून अनेक अशी कारणे आहेत जी अनेक प्रकरणांमध्ये दिसून आली आहेत. खरे कारण कोणते ते निदान झाल्यावरच कळू शकते. त्यामुळे वेळीच तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :  मुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल

(वाचा :- Joint Muscle Oil : गुडघेदुखी व हाडांतील वेदना 1 रात्रीत होतील गायब, लावा आयुर्वेदिक डॉक्टरांची ही 6 घरगुती तेल)​

टीबीवर उपाय काय? (Treatment Of TB)

-treatment-of-tb
  1. टीबीच्या पहिल्या टप्प्यात – 6 महिन्यांची औषधे दिली जातात आणि बॅक्टेरियाचा प्रसार होऊ नये आणि मोठ्या प्रमाणातील बॅक्टेरिया कामयचे मरावेत म्हणून नियमितपणे पाठपुरावा केला जातो. जेणेकरून रुग्णाला पुन्हा टीबीची लागण होऊ नये.
  2. टीबीच्या दुसऱ्या टप्प्यात – 8 ते 9 महिन्यांच्या टीबी औषधांची आवश्यकता असते. ज्याद्वारे शरीरातील टीबीचा अंश निष्क्रिय करण्यावर लक्ष दिले जाते.
  3. जर एखाद्या व्यक्तीला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधील औषधे घेतल्यानंतरही आराम मिळत नसेल. तर तो तिसऱ्या किंवा चौथ्यांदा टीबीची लागण झालेला रूग्ण असतो, म्हणून त्याला MDR TB म्हणजेच मल्टीड्रग रेसिस्टेंट टीबी असू शकतो.

(वाचा :- Lung Cancer Remedies : फुफ्फुसे आतून पोखरून निकामी करतात या 3 गोष्टी, कॅन्सरपासून बचावासाठी लगेच करा हे 5 उपाय)​

या गोष्टींची घ्या काळजी

या गोष्टींची घ्या काळजी

मल्टीड्रग रेसिस्टेंट टीबीसाठी अत्यंत कठोर उपचार आवश्यक असतात आणि त्याचे निदान जीन एक्सपर्ट टेस्टिंग द्वारे केले जाते ज्याद्वारे जीन एक्सपर्ट टेस्ट केल्या जाऊ शकतात. तर मंडळी, टीबी हा आजार जरी भयानक असाल तरी तो बरा होऊ शकतो, फक्त त्यात हलगर्जीपणा करू नये. वेळीच जर उपचार घेतले तर या आजारापासून सहज सुटका मिळवता येते.
(वाचा :- Mental Health : धावपळ केल्यानंतरही 100 स्पीडने धावेल शरीर, हे 5 उपाय केल्यास रोबोटसारखं काम करूनही थकणारच नाही)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …