परवेझ मुशर्रफनी 7 वर्ष किडनी, लिव्हर, हार्टच्या नसा ब्लॉक करणा-या आजाराशी दिला लढा, या 10 लक्षणांनी केलं तांडव

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती Pervez Musharraf यांचे रविवारी वयाच्या 79 व्या वर्षी दुबईतील अमेरिकन रुग्णालयात निधन झाले. ते Amyloidosis नावाच्या आजाराने ग्रस्त होते आणि मार्च 2016 पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या अवयवांमध्ये आणि टिश्यूंमध्ये एमायलॉयड नावाची असामान्य प्रथिने तयार होतात, ज्यामुळे त्यांच्या कार्यावर परिणाम होतो.

या आजाराबद्दल फारशी जागरूकता सामान्य लोकांना नाही. अनेकांना नाव एकून हा आजार अतिगंभीर वाटतो आणि तर अनेकजण असा आजार आपल्याला काय होणार असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करतात. आज आपण याच लेखातून जाणून घेऊया की हा आजार काय आहे, त्याची लक्षणे कोणती आहेत, कोणाला याचा धोका आहे आणि तो कसा टाळता येईल. (फोटो साभार: iStock and Twitter-Pervez Musharraf)

Amyloidosis नक्की आहे काय?

amyloidosis-

Mayo Clinic च्या रिपोर्टनुसार, अमाइलॉइडोसिस हा दुर्मिळ आजार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अवयवांमध्ये अमायलोइड नावाचे प्रोटीन तयार होऊ लागते तेव्हा हा आजार होतो. त्यामुळे शरीराचे अवयव नीट काम करू शकत नाहीत. त्याचा सर्वात मोठा परिणाम हृदय, मूत्रपिंड, लिव्हर, प्लीहा, मज्जासंस्था अर्थात नर्व्हस सिस्टम आणि पचनसंस्थेवर होतो. यात प्रोटीनची पातळी वाढल्याने हृदय अपयश, मूत्रपिंड निकामी आणि लिव्हर निकामी होण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा :  Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?

(वाचा :- लघवीत हा रंग दिसणं म्हणजे किडनीच्या कॅन्सरची सुरूवात? डॉ. सांगितली किडनीच्या कॅन्सरची 10 ठोस लक्षणं, व्हा सावध)​

आजाराची लक्षणे काय आहेत?

आजाराची लक्षणे काय आहेत?

या आजाराची सर्वात चिंतेची बाब म्हणजे यात कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. असे देखील शक्य आहे की आजारपणानंतर तुम्हाला लक्षणे जाणवणार नाहीत. ह्या आजारात एकापेक्षा जास्त अवयव प्रभावित होत असल्याने, प्रभावित झालेल्या अवयवानुसार लक्षणे बदलू शकतात. चला तर काही सामान्य लक्षणे जाणून घेऊया. डोळ्यांच्या आसपास डार्क सर्कल्स तयार होणे, जीभेला खाज येणे आणि रंग बदलणे, खूप जास्त थकवा आणि कमकुवतपणा होणे, श्वास घेण्यात समस्या निर्माण होणे, सुन्न पडणे, हात पाय दुखणे, पायांना सूज येणे, अतिसार, बद्धकोष्ठता सुरु होणे, विष्ठे मधून रक्त येणे, त्वचेत बदल दिसणे ही ती लक्षणे होय.

(वाचा :- पोटात बनतो गॅस-अ‍ॅसिडिटी? लगेच चघळा ही गोष्ट, पचनक्रिया मजबूत व डायबिटीज-कोलेस्ट्रॉलसारखे 10 आजार होतील छुमंतर)​

आजाराची कारणे काय आहेत?

आजाराची कारणे काय आहेत?

शरीरात अमायलोइड्स वाढल्यामुळे हा आजार होतो. हे एक प्रकारचे प्रथिने आहे जे अनेक अवयव आणि ऊतींमध्ये जमा होऊ शकते. अनेकदा हा आजार अनुवांशिक असतो तर अनेक वेळा बाह्य कारणांमुळे जळजळ किंवा दीर्घकालीन डायलिसिसशी संबंधित आजार देखील कारणीभूत असू शकतात. ब्रॉन्काइक्टेसिस असलेल्या काही रुग्णांना अमायलोइडोसिसचा धोका असू शकतो.

हेही वाचा :  रशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ

(वाचा :- पोट साफ न झाल्याने आतडी जातात पूर्ण सडून, दुधात मिसळून प्या हा एक पदार्थ, झटक्यात बाहेर पडेल पोटातील सर्व घाण)​

या गोष्टींमुळे वाढू शकतो धोका

या गोष्टींमुळे वाढू शकतो धोका

MayoClinic च्या मते, काही घटक या आजाराचा धोका वाढवू शकतात, वय हे त्यापैकी एक आहे. 60 ते 70 वयोगटातील लोकांना ह्या आजाराचा जास्त धोका असतो. हा आजार पुरुषांना जास्त प्रभावित करतो. काही संसर्गजन्य रोग देखील ह्या आजाराच धोका वाढवू शकतात, जर कुटुंबातील कोणाला हा आजार झाला असेल तर तुम्हालाही तो होण्याचा धोका असू शकतो. किडनी डायलिसिस मुळे सुध्दा या आजाराचे संकट निर्माण होते.

(वाचा :- Cancer Early Sign: ही 5 लक्षणं ओरडून सांगतात झाली आहे कॅन्सरची सुरूवात, Stage 1 आधीच करा ही 7 कामे, वाचेल जीव)​

अवयवांचे कार्य थांबते

अवयवांचे कार्य थांबते

अमाइलॉइड हृदयाच्या कार्यावर परिणाम करते, ज्यामुळे हृदयाचे ठोके मंद होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे प्रथिन किडनीमध्ये जमा झाल्यामुळे किडनीचे फिल्टरिंगचे काम थांबते. त्याचप्रमाणे जेव्हा मज्जासंस्थेवर परिणाम होतो, तेव्हा तुम्हाला बोटांमध्ये वेदना, सुन्नपणा जाणवू शकते. तसेच अनेक वेळा मुंग्या आपल्या सारखे देखील वाटू शकते.

हेही वाचा :  राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय

(वाचा :- रोज या 5 चुका करणारे लोक खेळतायत स्वत:च्या जीवाशी जीवघेणा खेळ, दुसरी चूक अत्यंत घातक, आजच सोडा नाहीतर..!)​

डॉक्टरांना कधी दाखवावे?

डॉक्टरांना कधी दाखवावे?

लक्षात ठेवा की या आजाराची स्वतःची कोणतीही विशेष लक्षणे नाहीत. हा आजार शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करत असल्याने त्याची लक्षणे त्या अवयवांच्या खराब कार्याशीही संबंधित असू शकतात. जर तुम्हाला अवयव खराब झाल्याची लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही विलंब न करता डॉक्टरांकडे जावे.

(वाचा :- World Cancer Day : संधोशनात दावा – 1 नाही तब्बल 34 प्रकारच्या कॅन्सरचं मुळ आहेत रोज खाल्ले जाणारे हे 15 पदार्थ )

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …