हे 5 पदार्थ करतात इम्युनिटी लोखंडाइतकी मजबूत, कोरोना ते कॅन्सर कोणताच भयंकर आजार करू शकणार नाही शरीरावर हल्ला

हिवाळ्यात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढतो. त्यामुळे सर्दी-खोकला, तापाचे रुग्णही झपाट्याने वाढतात. यासोबतच आजकाल Covid19 चा संसर्गही झपाट्याने पसरतो आहे. चीनसारख्या देशात Corona च्या नवीन व्हेरिएंट्समुळे झालेल्या विध्वंसामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती अर्थात Immunity मजबूत करून प्रतिबंध केला तर त्याची लक्षणे व धोका कमी केला जाऊ शकतो.

तुमच्याही मनात कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल की रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची? तर मंडळी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जीवनशैलीच्या सवयी सुधारणे. तसेच, आहारात अशा पदार्थांचा समावेश करा जे रोगांशी लढण्यासाठी शरीराची ताकद वाढवण्याचे काम करतात. अजूनही कळले नाही? चला आपण याच संदर्भातील माहिती आजच्या लेखातून घेऊया. (फोटो सौजन्य :- ISTOCK)

आवळ्याने वाढते इम्युनिटी

आवळ्याने वाढते इम्युनिटी

NCBI च्या मते, आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे टॉनिक म्हणून काम करते. आवळा व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतो. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि रोग निर्माण करणारे जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी ओळखले जाते. या व्यतिरिक्त ह्या संशोधनामधून हे देखील सिद्ध झाले आहे की आवळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास मदत होते, जे सामान्य सर्दी, फ्लू आणि कोविड सारख्या विशिष्ट रोगांशी संबंधित असल्याचे मानले जाते.

हेही वाचा :  Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी

(वाचा :- Sinus Remedy : सायनस इनफेक्शनमध्ये दिसतात ही भयंकर व वेदनादायी लक्षणं, नाक मोकळं करण्यासाठी घरीच करा हा 1 उपाय)​

खरबूजांच्या बियांचा वापर

खरबूजांच्या बियांचा वापर

आरोग्य तज्ज्ञ आणि जायरोपॅथीच्या संस्थापिका, कामायनी नरेश म्हणतात, खरबूजाच्या बिया या लोह आणि खनिजांनी समृद्ध असतात आणि त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील असतात. हे पोषक घटक चयापचय नियंत्रित करतात आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. एवढेच नाही तर खरबूजाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे विषाणूजन्य संसर्गामुळे होणारी जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी होण्यास मदत होते.

(वाचा :- सडलेल्या व विष भरलेल्या लिव्हरला पुन्हा जिवंत करतात हे 5 पदार्थ, लिव्हर फुटण्याआधी करा डॉक्टरांचे हे सोपे उपाय)​

इचिनेशिया करते इन्फेक्शनपासून बचाव

इचिनेशिया करते इन्फेक्शनपासून बचाव

फ्लेव्होनॉइड्स, सिकोरिक ऍसिड आणि रोझमॅरिनिक ऍसिडसह भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे इचिनेसिया हे औषधी फूल म्हणून ओळखले जाते. हे फुल शरीराचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की इचिनेसिया सर्दी, फ्लू आणि COVID-19 ची लक्षणे आणि कालावधी कमी करण्यास मदत करते आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढवते. त्यामुळे ह्या फुलाला सध्या मोठी मागणी आहे.

हेही वाचा :  Corona रुग्णांच्या मृतांचा आकडा वाढल्याने चिंता वाढल्या, या राज्यात सर्वाधिक मृत्यू

(वाचा :- हाडांतील प्रोटिन-कॅल्शियम अक्षरश: शोषून घेतात हे 6 पदार्थ, हाडांचा भुगा होण्याआधी करा AIIMS डॉक्टरांचे हे उपाय)​

इम्युनिटी वाढवण्यासाठी हळद खावी

इम्युनिटी वाढवण्यासाठी हळद खावी

हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून पारंपारिक औषधांमध्ये हळदीला महत्वाचे स्थान आहे. दाहक विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्मांसाठी हळदीचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत तहळदीचे सेवन वारंवार सर्दी, फ्लू आणि कोविडपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कर्क्युमिन मुळे सतत होणारा खोकला आणि शिंका रोखल्या जातात. तसेच शरीरातील जळजळ देखील कमी होते.

(वाचा :- Republic Day: भारतीय सैनिकांना 0 अंश तापामानात लढण्यासाठी शक्ती देते हे जेवण, नाश्त्यात दिले जातात हे 3 पदार्थ)​

तुळशीचे सेवन

तुळशीचे सेवन

तुळशीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तुळशी मधील लोह, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, तसेच युजेनॉल आणि कार्व्हाक्रोल सारखे घटक तुळशीला अधिक गुणवान आणि रामबाण बनवतात. याव्यतिरिक्त, तज्ञांनी सांगितले की तुळशीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म देखील आहेत, जे सर्दी, फ्लू आणि अगदी कोरोनाव्हायरस सारख्या रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात.

हेही वाचा :  Corona Latest Updates : देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून मोठी माहिती

(वाचा :- Soaking Nut: भिजवून खा हे 5 पदार्थ एनर्जी वाढेल, थकवा व मेंदूचे रोग नष्ट होऊन चित्त्याच्या वेगाने धावेल बुद्धी )
टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …