Covid19 4th wave : बापरे, रिसर्चमध्ये मोठा खळबळजनक दावा – जूनमध्ये येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ‘ही’ 10 लक्षणं माजवणार कहर!

करोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) धोका अद्याप संपलेला नाही. अर्थात कोरोनाचे रोजचे नवे रुग्ण कमी होत आहेत पण व्हायरसचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक प्रकार असलेल्या ओमिक्रॉन प्रकारापासून (Omicron variant) थोडासा दिलासा मिळाला होता तोच संशोधकांनी असा अंदाज वर्तवला आहे की, लवकरच देशात कोविड-19 ची चौथी लाट (Covid 4th wave) येऊ शकते. Medrxiv वर प्रकाशित केलेल्या अभ्यासात, IIT कानपूरच्या संशोधकांनी सांगितले की, ‘भारतात कोरोनाची चौथी लाट 22 जूनच्या आसपास सुरू होऊन 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहू शकते. कोविड-19 ची चौथी लाट आली तर ती किमान चार महिने टिकू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत लाट शिगेला पोहोचू शकते आणि त्यानंतर हळू हळू कमी होऊ शकते. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी देशात कोविड-19 लाटेचा अंदाज लावण्याची ही तिसरी वेळ आहे आणि तिसर्‍या लाटेबद्दलचा त्यांचा अंदाज अगदी काही अंशी खराही ठरला होता. यावेळी करोनाची चौथी लाट किती प्राणघातक असेल आणि त्याची तीव्रता किती असेल हे कोरोनाचा प्रकार (corona variant) आणि लसीकरणावर अवलंबून आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :  कल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

Omicron BA.2 बनणार का करोनाच्या चौथ्या लाटेचं कारण?

omicron-ba-2-

सध्याची परिस्थिती पाहता, Omicron BA.2 मुळे कोरोना विषाणूची चौथी लाट येऊ शकते. सध्या ओमिक्रॉन आणि पूर्वीच्या सर्व प्रकारांची प्रकरणे जगभरात कमी झाली आहेत. पण Omicron BA.2 ने भारतासोबतच इतर काही देशांमध्ये वेग घेतला आहे आणि त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

(वाचा :- Mahashivratri 2022 : ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने डायबिटीजसारखे 5 भयंकर आजार होतात बरे..!)

Omicron BA.2 काय आहे?

omicron-ba-2-

Omicron ba.2 हा Omicron चा उपप्रकार म्हणजेच सबव्हेरिएंट आहे. याला स्टील्थ ओमिक्रोन (Stealth Omicron) असेही म्हणतात. Omicron BA.2 मध्ये कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांपेक्षा वेगाने पसरण्याची क्षमता आहे. कोरोनाचा हा प्रकार गेल्या काही आठवड्यांत झपाट्याने पसरला आहे आणि त्याची लक्षणेही करोना विषाणूच्या इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत.

(वाचा :- Weight Loss : वयाच्या 22 व्या वर्षी या मुलाचे वजन तब्बल 137 किलोवर पोहचले, काहीच दिवसांत ‘ही’ ट्रिक वापरून घटवलं 63 किलो वजन..!)

हेही वाचा :  तब्बल 57 करोडच्या आसपास कमाई असणा-या श्रद्धा कपूरचा हा आगळावेगळा अवतार पाहून व्हाल थक्कच

Omicron BA.2 ची सुरूवातीची लक्षणे

omicron-ba-2-

एका अहवालानुसार चक्कर येणे हे ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटच्या (Omicron subvariant) सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. चक्कर येण्यामागे इतर कारणे असू शकतात परंतु ही स्थिती कायम राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणखी एक लक्षण म्हणजे थकवा. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की थकवा हे देखील ओमिक्रॉनचे पहिले लक्षण असू शकते.

(वाचा :- महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!)

Omicron BA.2 ची लक्षणे काय आहेत?

omicron-ba-2-

BA.2 ची लक्षणे त्याचं मूळ स्वरूप ओमिक्रॉन सारखीच आहेत. ओमिक्रॉन सबव्हेरिएंट असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनो व्हायरसची सामान्य लक्षणे तसेच पोटात संबंधित लक्षणेही दिसत आहेत. याचा त्रास होत असताना तुम्हाला ताप, सततचा खोकला, चव खराब होणं यासोबतच इतर लक्षणंही दिसून येऊ शकतात.

  • नाक वाहणं
  • थकवा जाणवणे
  • डोकेदुखी
  • नवीन प्रकारचा सततचा खोकला
  • धाप लागणे
  • स्नायू किंवा शरीरात वेदना
  • चव किंवा वासाची जाणीव कमी होणे
  • घसा खवखवणे
  • उलट्या किंवा मळमळ
  • अतिसार

(वाचा :- Weight loss hacks : भात शिजवताना टोपात एक चमचा ‘ही’ एक गोष्ट घाला, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी..!)

हेही वाचा :  “महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Omicron BA.2 ची पोटाशी निगडीत लक्षणे काय?

omicron-ba-2-

Omicron BA.2 ग्रस्त रुग्णांमध्ये पोटाच्या तक्रारी दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे कोरोना विषाणू तोंडातून किंवा नाकातून शरीरात प्रवेश करून फुफ्फुसात जातो. काही प्रकरणांमध्ये ते आतड्यातही जाऊ शकतात आणि तुम्हाला वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. जसे की –

  • मळमळ
  • अतिसार
  • उलट्या होणे
  • पोटदुखी
  • पोटात जळजळ
  • सूज येणे

(वाचा :- Bad Habits : विषासमान आहेत तुमच्या सकाळच्या या 5 सवयी, लवकरात लवकर बदला अन्यथा धोक्यात येईल आयुष्य..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर …

सोन्याच्या तब्बल 6600 विटा, 132 कोटींचा ऐवज; जगातील सर्वात मोठ्या चोरीची Inside Story

Canadas gold heist Inside story : ‘मनी हाईस्ट’ या कलाकृतीनं प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवलं. याच …