Corona Latest Updates : देशात लॉकडाऊन….; IMA च्या डॉक्टरांकडून मोठी माहिती

Corona Latest Updates : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत. कोरोनाच्या “BF.7” या व्हेरिएंटचे काही रुग्ण देशात आढळल्यामुळं एकच खळबळ पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं नागरिकांमध्येही पुन्हा एकदा भीतीचं वातावरण दिसू लागलं आहे. या साऱ्यामध्येच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

देशात लॉकडाऊन लागणार का? (India Lockdown)

चीनमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाच भारतामध्ये सर्वत्र सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. देशात लॉकडाऊन लागणार का, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. आता राहिला प्रश्न की खरंच भारतात Lockdown लागणार का? 

 

Indian Medical Association कडून यासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट करण्यात आलं. डॉ. अनिल गोयल यांनी देशात लॉकडाऊन (Lockdown) लागणार की नाही यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्यातरी भारतात लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती उदभवली नसल्याचं सांगितलं. 

हेही वाचा :  जालना लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; पोलीस अधिक्षकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर

‘देशात सध्यातरी लॉकडाऊन परिस्थिती उदभवलेली नाही, कारण 95 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे. भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चीनमधील नागरिकांपेक्षा जास्त चांगली आहे. त्यामुळं भारतात सध्यातरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीची अंमलबजावणी, चाचण्यांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे’, असं डॉक्टर गोयल म्हणाले. 

सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा…  

IMA कडून कोरोनाच्या धर्तीवर नागरिकांना लग्न सोहळा, राजकीय कार्यक्रम किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक मेळावे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), मास्क (Mask) आणि सॅनिटायझरचा (Sanitizer) जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मास्क सक्ती? 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थान सतर्क असून, इथं दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात येत आहे. सोबतच सोशल डिस्टनसिंग सह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. तिथे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानही अलर्ट मोडवर आलं आहे. इथं मंदीर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत त्यांना मास्क मोफत वाटले जात आहेत. तर मंदिर परिसरात मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :  कर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …