या अभिनेत्रीने ५६ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, गरोदर राहिल्याने डॉक्टरही झाले अवाक्

Claudia Raia: वयाच्या ५६ व्या वर्षी ब्राझिलियन टेलेनोवेला दिवा क्लाऊडिया राईया आणि तिचा पती जरबस होमेम डी मेलो याच्या घरी लुसाचा जन्म झालाय. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती शेअर केली होती.

क्लाऊडियाला याआधीची २५ वर्षाचा मुलगा एंझो आणि १९ वर्षाची मुलगी सोफियादेखील आणि आता अचानक ५६ व्या वर्षी आई झाल्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत आहे. याबाबत गुडगावमधील मदरहुड हॉस्पिटलमधील गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. श्वेता वझीर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Instagram @claudiaraia)

बऱ्याच कमी केसेस

बऱ्याच कमी केसेस

राईया IVF शिवाय नैसर्गिकरित्या प्रेग्नंट झाली असून डॉक्टरही या घटनेने हैराण झाले आहेत. बोस्टनमधील वुमन हॉस्पिटलमधील रिप्रॉडक्टिव्ह अँडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. एलिझाबेथ सार गिन्सबर्गच्या म्हणण्यानुसार, अशा पद्धतीच्या केस केवळ १ टक्के दिसून येतात. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिला बाळाची आई कमी आणि आजी दिसत असल्याचे म्हणून ट्रोल केले जात आहे. मात्र आई-वडील दोघेही आनंदी आहेत.

डॉक्टर काय सांगतात

डॉक्टर काय सांगतात

डॉक्टर श्वेताच्या सांगण्यानुसार, आई होण्यासाठी वय हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. ज्या महिलांचे वय अधिक आहे त्यांना गरोदरपणात प्लेसेंटा प्रिव्हिया होण्याचा धोका अधिक असतो. याशिवाय यामध्ये इमर्जन्सी सिझेरियन, पोस्टपार्टम हॅमरेज आणि लो बर्थ वेटचा धोकाही संभवतो. तसंच वाढत्या वयासह हा धोका अधिक वाढत जातो.

हेही वाचा :  मुलांच्या ओठांवर चुंबनामुळे छवी मित्तलवर टीका, मुलांना Kiss करणे योग्य की अयोग्य

( वाचा – ६ महिन्यात दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म, मोमो ट्विन्स म्हणजे नेमके काय )

काय करावे

काय करावे

डॉक्टर श्वेता यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रेग्नेंट होण्यापूर्वी महिलांनी एकदा आपल्या न्यूट्रिशियनशी बोलून घ्यावे. तसंच आपली जीवनशैली, STI Test, हेल्दी गरोदरपणातील वजन आणि अन्य गोष्टींबाबत आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करावी. बाळाच्या सुरक्षित डिलिव्हरीसाठी डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतात.

(वाचा – प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग का होते? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास, गर्भपाताचा होऊ शकतो त्रास)

४० व्या वर्षानंतर फर्टिलिटी इश्यू

४० व्या वर्षानंतर फर्टिलिटी इश्यू

४० व्या वर्षानंतर गर्भधारणा होणे आणि निरोगी गर्भवस्था राहणे हे अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते महिलांमध्ये ३५ व्या वर्षानंतर अंड्याचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी होते. वृद्ध महिलांना काही अनुवंशिक दोषही शरीरात आढळू लागतात आणि शरीर संवेदनशील होते. तंच अँडोमेट्रियोसिस आणि गर्भाशय फायब्रॉईड या दोन्ही गोष्टींचा त्रास होऊ शकतो.

(वाचा – स्तनपानादरम्यान स्मार्टफोनचा वापर आईला करतोय बाळापासून दूर, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता)

गर्भपाताचाही धोका

गर्भपाताचाही धोका

वयाच्या ४० व्या वर्षानंतर गर्भधारणात बाळ न राहण्याचा अथवा गर्भभात होण्याचा धोका अधिक संभवतो. याबाबत नेहमीच डॉक्टर सल्ला देत असतात. राईयाच्या बाबतीत अशा गुंतागुंतीचा कोणताही अनुभव शेअर झालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे.
वयाच्या विशिष्ट वयानंतर आई व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात याचा विचार करून नये.

हेही वाचा :  वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती

हे आर्टिकल हिंदीमध्ये वाचा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …