H3N2 इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रेग्नन्सीवर प्रभाव पडणे धोकादायक?

H3N2 Influenza हे नक्की काय आहे आणि संभाव्य परिणाम काय आहेत? H3N2 विषाणू काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत? या व्हायरसमुळे शरीरात तापाचे भान राहत नाही. जर आपल्याला अंगदुखी, घसा खवखवणे आणि खोकल्या व्यतिरिक्त श्वासोच्छवासाचा त्रास होतो. सध्या एक लक्षण आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचा गंभीर परिणाम प्रेग्नन्सीवरही होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि बाळासाठी तुमच्या नातेसंबंधाला प्राधान्य दिले पाहिजे, खासकरून जर तुमची पत्नी गर्भवती असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत डॉ. कोमल भादू, प्रसूती तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांनी माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

H3N2 Influenza नेमके काय आहे?

h3n2-influenza-

H3N2 Influenza हा तापाचा एक प्रकार आहे. कोविड म्हणजेच कोरोनाशी मिळतीजुळती लक्षणे असलेला हा नवा व्हायरस असून सध्या या तापाच्या केस अधिक प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहेत. हा आजार गंभीर असून वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे. विशेषतः गर्भवती महिलांनी याची काळजी घ्यावी. कारण याचे संक्रमण गर्भवती महिलांना लवकर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  "मक्केतील मशिदीवर हल्ला झाला तेव्हा..."; सौदीच्या मुस्लिम नेत्यासमोरच NSA डोवाल यांचा सल्ला

प्रेग्नन्सीमध्ये काय आहे धोका?

प्रेग्नन्सीमध्ये काय आहे धोका?

गर्भधारणा झालेल्या महिलेला गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत ताप आल्यास त्याचे काय होऊ शकते? तीन महिन्यांत बाळ नाजूक अवस्थेत असते. त्यामुळे या तापासाचा परिणाम होऊन गर्भपात होऊ शकतो. तसंच तुम्हाला ताप असल्यास, त्याचा बाळाच्या आरोग्यावर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो, यामध्ये स्पायना बिफिडा सारख्या अनुवांशिक विकाराने त्रस्त होऊ शकता

(वाचा – एडिमामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे नेमके काय)

गर्दीत अजिबात फिरू नका

गर्दीत अजिबात फिरू नका

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, घरात कोणालाही खोकला असला तरी आपण बाहेर गर्दीत फिरू नये किंवा फिरताना मास्क घालावा. तुम्हाला एखाद्याच्या सहवासात काम करायचे असेल तर मास्कशिवाय काम करू नये.

(वाचा – एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? लक्षणं, कारणे आणि उपचार घ्या जाणून )

WHO ने लसीकरणाचा दिला सल्ला

who-

गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या कोणत्याही काळात लसीकरण करून घेता येईल आणि या आजारापासून वाचण्यासाठी गरोदर महिलांना लसीकरण करण्याचे आवाहनही WHO ने केले आहे. यासाठी WHO ने H3N2 संदर्भात संपूर्ण माहितीच प्रकाशित केलेली दिसून येते.

हेही वाचा :  पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ; शास्त्रज्ञांच्या धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

गंभीर आजार असणाऱ्या गरोदर महिला

गंभीर आजार असणाऱ्या गरोदर महिला

ज्या महिलांना डायबिटीस, कॅन्सरसारखा गंभीर आजार आहे अथवा होऊन गेला आहे आणि त्या गरोदर असतील तर अशा महिलांनी स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायला हवी. कोणतीही औषधे वा लसीकरण चुकवू नये. आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करू नये. थोडाही ताप, सर्दी – खोकला जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

डिस्क्लेमरः H3N2 Influenza अधिक वेगाने पसरत आहे. वेळीच काळजी घ्यायला हवी. ही माहिती तुमच्या ज्ञानासाठी डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र अधिक माहितीसाठी स्वतःच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …