टीम इंडियाच्या वर्ल्डकप मोहिमेला धक्का; जडेजा,बुमराहनंतर या स्टार खेळाडूला दुखापत

नवी दिल्ली: येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपच्या आधी स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता टीम इंडियाच्या वर्ल्डकप मोहिमेतील आणखी एक खेळाडूला दुखापत झाली आहे.

भारताचा अतिरिक्त संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जलद गोलंदाज दीपक चहर खेळू शकला नाही. त्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चहरला टी-२० मालिके दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिल्या वनडेत खेळू शकला नाही.

वाचा- WWE स्टार सारा लीचे निधन; वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, मृत्यूचे कारण…

दीपक चहर मालिकेतील उर्वरीत दोन सामने खेळू शकणार नाही. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दीपकची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप संघात दीपक स्टॅडबाय खेळाडू आहे. बुमराहच्या दुखापतीमुळे संघात दीपकची दावेदारी मजबूत समजली जात होती.

वाचा- सौरव गांगुली देणार अध्यक्षपदाचा राजीनामा, BCCI अध्यक्षांच्या शर्यतीत नवे नाव समोर

दीपक चहरला फ्रेब्रुवारी महिन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघात परतला होता. आता पुन्हा एकदा त्याला दुखापत झाल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दीपकने ३ सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. ३ विकेटसह अखेरच्या सामन्यात ३१ धावा केल्या होत्या. तर झिम्बाब्वे दौऱ्यातील २ सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या.

वाचा- Exclusive Interview: बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्र कधी अव्वल होईल; सिंधूने एका वाक्यात दिले उत्तर

टी-२० वर्ल्डकपसाठीच्या मुख्य संघात भलेही त्याला स्थान मिळाले नसले तरी बुमराहच्या जागी तो मुख्य दावेदार आहे. त्या शिवाय मोहम्मद शमी देखील स्पर्धेत आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

धक्कादायक! आणखी एका बॉलरला इन्ज्युरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून ‘आऊट’

रांची, 8 ऑक्टोबर: आशिया कप स्पर्धेपासून भारतीय संघाला लागलेलं दुखापतींचं ग्रहण अजूनही सुटलेलं नाही. रवींद्र जाडेजा …

दुसऱ्या वन डेसाठी रांचीत पोहोचली टीम इंडिया, अनोख्या पद्धतीन झालं स्वागत, Video

रांची, 8 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरी वन डे उद्या रांचीत खेळवली …