Tag Archives: Viral News

जुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, ‘ती’ 40 मिनिटे ठरली महत्त्वाची

Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील …

Read More »

RTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, ‘तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत’

Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वामध्ये (Business) मोठं नाव कमवून महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) या उद्योगसमुहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच तरुणाईच्या मनात घर केलं आहे. तरुणाईला भावणाऱ्या कल्पनांना दुजोरा देत, त्यांना प्रोत्साहन देत आणि सतत नवनवीन संकल्पनांवर चर्चा करत इतरांचेही सल्ले विचारात घेण्याच्या आणि सर्वांसोबत पुढे जाण्याच्या शैलीमुळं आनंद महिंद्रा अनेकांच्याच आवडीचे. म्हणूनच की …

Read More »

Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब …

Read More »

उड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर

Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या मोतिहारी रस्त्यांवर शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या उड्डाणपुलाच्या खाली भलेमोठे विमान फसले. उड्डाणपुलाच्या खाली विमान फसल्याने परिसरातून एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या पुलाच्या खाली विमान आलेच कसे? तर विमानतळाच्या जवळ उड्डाणपुल कसा आला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊया.  बिहार येथील मोतिहारी …

Read More »

कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे …

Read More »

विमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतोय तरुणाचे कौतुक, कारण…

Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. …

Read More »

पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?

Parle G Biscuit Post: पार्ले-जी हे बिस्किट भारतात खूपच लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चहासोबत पारले-जी बिस्किट खाण्यास आवडते. पार्ले-जी बिस्कीटाची आणखी एक खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पण आता पार्लेजीच्या कव्हरवर मात्र एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो छापण्यात आला आहे.  सोशल मीडियावर तशी एक पोस्ट सध्या व्हायरल होतंच. पार्लेजीने हा बदल नेमका का केलाय? …

Read More »

मैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील

Viral News : भारतातील अनेक राज्यांमध्ये विस्तीर्ण क्षेत्र घनदाट वनांनी (Forest) व्यापलं असून, या वनांमध्ये असंख्य प्रजातींच्या वन्य जीवांचा वावर पाहायला मिळतो. या प्राण्यांपैकी काही हिंस्र प्राणी कायमच काळजाचं पाणी करतात. हे प्राणी दुरून पाहणं जितक्या कौतुकाची बाब, तितकेच ते जवळ आले की मात्र थरकाप उडतो ही काळ्या दगडावरची रेघ. अशा या वन्य जीवांना अधिकाधिक वावर असणारं देशातील एक ठिकाण …

Read More »

याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या

Seema Haider Viral Answersheet : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. 13 मे रोजी अवैध पद्धतीने सीमा हैदरने भारतात घुसखोरी केली. त्यानंतर ती ग्रेटर नोएडा इथे ती सचिन मीणा नावाच्या व्यक्तीसोबत राहते. सीमा हैदरची यूपी एटीएसकडून चौकशी देखील करण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर सीमा हैदर प्रकरण चर्चेत आलं होतं. अशातच आता सीमा हैदर पुन्हा …

Read More »

ख्रिसमसचं गिफ्टआणि सुजले ओठ…हालत पाहून घरचे टेंशनमध्ये

आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासोबतच आपल्यामध्ये असे काही लोक आहेत जे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. आता बल्गेरियातील एका महिलेने असेच काहीस केलंय. तिचे नाव एंड्रिया इव्हानोव्हा आहे आणि ती जगातील सर्वात मोठी ओठ असलेली महिला म्हणून ओळखली जाते. अँड्रिया इव्हानोव्हा दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तिच्या ओठांमध्ये फिलर्स लावते. अशा परिस्थितीत यंदाही इवानोव्हाने …

Read More »

केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी …

Read More »

Video: पुण्यानंतर आता राजस्थानात परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने…

Russian Tourist Harassed in Jaipur: राजस्थानमध्ये दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावरही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भारतीय तरुण त्याच्या रशियन मैत्रिणीसोबत दिसत आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, …

Read More »

Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Tribal Tradition :  सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. …

Read More »

Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलते बंद

Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला …

Read More »

Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला …

Read More »

पत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे ‘सिक्रेट लाइफ’; फोटो पाहून बसला एकच धक्का

Trending News In Marathi: 8 मार्च 2020मध्ये महिलेने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. वयाच्या 39व्या वर्षी मौली ब्रोडक हिने जगाचा निरोप घेतला. मौली अमेरिकेतील अटलांटा येथे राहत होती तर लेखक व विद्यापीठात शिक्षिका होती. नेहमी आनंदी असणाऱ्या मौलीने अचानक इतका टोकाचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मौलीचा पतीदेखील तिच्या मृत्यूने खचला होता. तिच्या कुटुंबीयातील लोकही तिने हा निर्णय का घेतला …

Read More »

जंगलाचा देवदूत म्हणून ओळखला जातो ‘हा’ प्राणी; Video पाहून तुम्हीही म्हणाल ‘अद्भूत’

Sifakas- Angels of the forest: शहरीकरण वाढत असताना जंगल वाचवणे आणि समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. पण तुम्हाला माहित्येये जंगलांना शहरीकरणापासून वाचवण्यासाठी आणि निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी जंगलातील प्राणीही तितकीच काळजी घेत असतात. जंगलातील प्राण्यांचा दरारा तर तुम्हाला माहितीच असले. यातील एक प्राणी म्हणजे सिफाकास (Sifakas) या प्राण्याला जंगलाचा देवदूत असं म्हणतात. मर्कट कुळातील हा प्राणी असून जमीनीपासून उंच उड्या …

Read More »

इलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये ‘इतकी’ किमी धावणार

Viral News : पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराने शंभरी गाठली असतानाच इंधनाला पर्याय म्हणून बाजार इलेक्ट्रीक गाड्या (Electric Vehicle) आल्या. इलेक्ट्रीक स्कुटर आणि इलेक्ट्रीक कारला मोठी मागणी आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्या एकदा चार्च केल्या की अनेक किलोमीटर धावतात. शिवाय प्रदुषणाची कटकटही नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इलेक्ट्रीक गाड्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. पण आता लवकरच …

Read More »

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो, घोड्यावर का बसत नाही? अन् तेही पांढरीत घोडी का?

Wedding Rituals : लग्नाचा सिझन सुरु झाला असून पुढील 23 दिवसात 35 लाख लग्न होणार आहेत. एका रिपोर्टनुसार 4.25 कोटींची उलाढाल फक्त या लग्न समारंभातून होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. लग्न हे दोघांचं मनोमिलनसोबत दोन कुटुंबाचा सोहळा…पण गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाचा हा सोहळा एक भव्यदिव्य सोहळा आणि कोटी रुपयांची उधळणपट्टी झाली आहे. असो, प्रत्येक समाजानुसार लग्नाच्या पंरपेरा आणि …

Read More »

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर

काही दिवसांपूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले होते तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त होत होती.  टोमॅटोचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये एकच गदारोळ उडाला होता. टोमॅटोचे भाव पाहिल्यानंतर अनेकांना तर यापेक्षा महाग भाजी असू शकत नाही असं बोललं जात होतं. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या भाजीबद्दल माहिती आहे का? अशाच महागड्या भाजीबद्दल जाणून घ्या. तसंच ही भाजी महाग का आहे ? आणि इतकी …

Read More »