Tag Archives: News in Marathi

Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! ‘व्लादिमीर’च्या शरीरावर…

Russian Spy Whale : रशियन (Russia) सैन्याची युक्रेनप्रती (Ukraine) असणारी भूमिका, संपूर्ण जगभरात चर्चेत असणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मनसुबे पाहता त्यांची पुढची चाल नेमकी काय असणार याबाबत सर्वांनाच धास्ती लागलेली असते. खासगी आयुष्यातील सिद्धांतांमुळेही अनेकांनाच हादरवणारे हे पुतिन (Putin) एका व्हेल माशामुळं पुन्हा चर्चेत आले आहेत. इतकंच नव्हे तर, सबंध रशिया आणि रशियाच्या संरक्षणार्थ तैनात असणारी Russian Navy …

Read More »

Video : बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

Heat wave in Vidarbha  : यंदाच्या वर्षीचा उन्हाळा काहीसा उशिरानं सुरु झाला. कारण, फेब्रुवारीपासून सुरु झालेला अवकाळी पाऊस थेट मे महिन्याच्या मध्यापर्यंत बरसत होता. किंबहुना आताही बरसत आहे. पण, राज्याचे काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. विदर्भ याला अपवाद ठरलेला नाही. विदर्भातील उकाडा म्हटलं की अनेकांनाच विचारानं घाम फुटतो. कसे राहता राव तुम्ही? असा भाबडा …

Read More »

Interesting! शिक्षक उत्तरपत्रिका, गृहपाठाची वही तपासताना लाल शाईचा पेनच का वापरतात?

Interesting Facts : शालेय आयुष्याचा टप्पा ओलांडून आपल्यापैकी अनेकजण पुढे आलेले असतात. किंबहुना जेव्हा हा टप्पा ओलांडून आपण मोठे होतो तेव्हा भूतकाळ आठवून आपणच नकळत हसू लागतो. तुमच्या शालेय जीवनातील काही आठवणी आहेत का, असा प्रश्न विचारला असता तुमचं काय उत्तर असेल? बरीच उत्तरं सुचतील ना? असो, यामध्ये एक बाब हमखास असेल ती म्हणजे परीक्षांचा निकाल आणि शिक्षकांचा शेरा.  परीक्षा …

Read More »

उद्धव ठाकरे कडाडले… ‘बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू’

Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. सर्वात आधी त्यांनी सोलगावमधल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला. राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला, असं चालणार नाही. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला …

Read More »

उरले फक्त काही तास…; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

Cyclone Mocha News: हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांसोबतच काही महत्त्वाचे इशारे देत IMD नं कायमच नागरिकांना सतर्क केलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एक महत्त्वाचा इशारा देत हवामान विभागानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कारण, 6 मे च्या जवळपास दक्षिण- पूर्व बंगालच्या खाडीनजीक असणाऱ्या भागात चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होत असून, त्यामुळं पुढच्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. …

Read More »

Barsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

Barsu Refinery Project Against Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला आंदोलक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी …

Read More »

बारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाची चाचपणी करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याचे काम सुरु झाले आहे. मात्र, स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. पोलिसांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना अटक केली आहे. तर काही ग्रामस्थांना ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या …

Read More »

राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!

Maharashtra Police : ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा मारा सोसत काही मंडळी नागरिकांच्या सेवेसाठी आणि शहरात, राज्यात सुव्यवस्था राखली जावी या हेतूनं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळं नागरिक आणि यंत्रणांच्या सेवेत असणाऱ्या या मंडळींच्या आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हीच बाब लक्षात घेता आता पोलीस खात्यासह वाहतूक शाखेत नोकरीवर असणाऱ्या पोलिसांना वाढत्या तापमानाच्या धर्तीवर महत्त्वाच्या सूचना देत सतर्क …

Read More »

Barsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगावमध्ये ग्रामस्थांच्या विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरुच आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत  बैठक झाली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांचा इशारा, ‘आम्ही सर्व एक आहोत, याद राखा!’ बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी …

Read More »

बारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav on Barsu Refinery Project : कृष्णात पाटील / मुंबई : बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, असे म्हणत ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. माझे सरकारला सांगणे आहे की, लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल, विशेष करुन भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे. तर, तुमचा असा पक्ष वाढणार नाही. कोकणातील जनता खरं …

Read More »

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल – उदय सामंत

Barsu Refinery Project Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता विरोध करणे चुकीचे आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे. बारसूत असे कोणतेही दडपशाहीचे वातावरण नसून …

Read More »

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Barsu Refinery Project : प्रणव पोळेकर / रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी आंदोलनकांना पोलिसांनी आवाहन केले. घरी निघून जा …

Read More »

तुम्ही पगारवाढीची वाट पाहतानाच Apple Store मध्ये काम करणारी ही पोरं उचलतायत दणदणीत पगार

Apple Store : जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असतानाच अॅपल (Apple ) मात्र वेगळ्याच आराखड्यानं पुढे जाताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या टेक कंपनीनं भारतात, मुंबईत त्यांचं पहिलंवहिलं स्टोअर सुरु केलं. त्यामागोमाग (Delhi) दिल्लीतही अॅपल स्टोअरची सुरुवात झाली. खुद्द अॅपलचे CEO टिम कुक (Tim Cook)  यांनी या क्षणी स्टोअरच्या उदघाटन सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. अॅपल स्टोअरच्या या नव्या …

Read More »

राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Ajit Pawar Letter to CM Eknath Shinde: महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्मघातामुळे 13 अनुयायांचा मृत्यू झाला.  ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या …

Read More »

Adventure : 48 व्या वर्षी गुहेत गेली, 50 व्या वर्षी बाहेर आली; तुफानी करण्याच्या नादात ‘या’ महिलेनं स्वत:ला एकटं डांबलं आणि…

Human Experiment : काही मंडळींना साचेबद्ध आयुष्य जगायचं नसतं. ही मंडळी मग वेगळ्या वाटा निवडतात आणि त्या वाटांचे वाटसरु होत संपूर्ण जगाच्या नजरा वळवतात. अशाच काहीशा वाटेवर एक महिला निघाली आणि दोन वर्षांसाठी तिनं या जगाशी असणारं नातं तोडलं. ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरीही हे खरं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी ती एका गुहेत गेली आणि 50 वर्षाची झाल्यानंतर तीनं …

Read More »

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अ‍ॅक्शनमध्ये नाना पाटेकर”

Bachchu Kadu On Eknath Shinde: दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येचे दौरा केला होता. यावेळी शिंदे गटातील काही आमदार अयोध्येत दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. शिंदे गटात काहीतरी बिनसलंय का? असा सवाल आता उपस्थित होत असताना संजय राऊतांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटात घुसमीरीचं वातावरण तयार …

Read More »

Tata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?

Tata Motors share : गेल्या दोन महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये (Share Market) चढउतार पहायला मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण होत असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता एका शेअर्समुळे गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक गुंतवणूकदारांचा लाडका शेअर अशी या शेअरची ओळख आहे. होय, टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये (Tata Motors) मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं …

Read More »

Air India : वाद करा पण इथं कुठं! विमानाने टेक ऑफ केलं तिथेच लॅण्डींग करण्याची वेळ; कारण वाचून थक्क व्हाल

Air India : विमान प्रवासादरम्यान घडणारे अनेक किस्से, प्रसंग आणि घटना बऱ्याचदा आठवणीत राहतात. पण, सगळ्याच आठवणी चांगल्या असतात असं नाही. अशाच काही मनस्ताप देणाऱ्या प्रसंगाला सामोरं जात या अप्रिय आठवणी एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणाऱ्या विमानातील प्रवाशांना मिळाल्या. तिथे विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटना कमी होत असतानाच आता तत्सम एका प्रकरणानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. (Air India Delhi London flight …

Read More »

School Reopening : जून महिन्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!

School Reopening : (SSC, HSC Board Esams) दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आता महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा मध्यावर आल्या आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा आता कुठं सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं लक्ष मात्र शेवटच्या पेपरकडेच आहे. कारण, परीक्षा संपल्यानंतर सुरु होतेय ती म्हणजे उन्हाळी सुट्टी.  दणक्यात उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) …

Read More »

स्वस्तात मस्त विमान तिकीट बुक करण्यासाठी Google करणार मदत, दर कमी झाल्यास पैसेही परत देणार

Google Flight Tickets : एखाद्या ठिकाणी (Travel) फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला जातो तेव्हा देशांतर्गत प्रवासासाठी सहसा आपण रेल्वेला प्राधान्य देतो. पण, विषय जेव्हा वेळ वाचवण्याचा येतो तेव्हा मात्र अनेकांचीच पसंती विमान प्रवासाला असते. अवघ्या काही तासांत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वातंत्र्य विमान प्रवासामुळं मिळतं. त्यामुळं वेळेची बचत होते आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जास्त वेळही देता येतो. पण, इच्छा असूनही …

Read More »