Tag Archives: NEP

NEP: शैक्षणिक धोरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’ हवा

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘आजवर एकशाखीय अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना होणारे अनेक तोटे अनुभवाला आले आहेत. बहुशाखीय अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांपुढे पर्याय उपलब्ध असतील, त्यामुळे त्यांच्या कलाने त्यांना क्षेत्रनिवड करता येईल. नव्या शैक्षणिक धोरणातील ही तरतूद अतिशय स्वागतार्ह आहे. मात्र, अशा अनेक तरतुदींच्या अंमलबजावणीचा ‘अॅक्शन प्लॅन’ मिळाल्याशिवाय धोरणाबाबत सध्या सुरू असलेले गोंधळाचे वातावरण कमी होणार नाही,’ असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे …

Read More »

NEP: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी दूरच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिक्षक दिनानिमित्त शिक्षकांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नवीन शिक्षण धोरणाची (New Education Policy) प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत वक्तव्य केले. मात्र याची अंमलबजावणी करणाऱ्या घटाकांपर्यंत अद्याप योग्य त्या सूचना पोहोचत नसल्याने राज्यात पुढील शैक्षणिक वर्षातही या धोरणाची अंमलबजावणी होणे अवघड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशभरात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सन २०२४पर्यंत पूर्ण करण्याचा …

Read More »

NEP: दहावी, बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलणार? जाणून घ्या तपशील

Board Exam: दहावी, बारावीच्या परीक्षा या आपल्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेहमीच चिंता असते. विद्यार्थ्यांसोबतच पालकांवरही या परीक्षांचा ताण असतो. दहावी, बारावीच्या परीक्षा धाकधूक वाढविणाऱ्या असतात असे तुम्हाला देखील वाटत असेल सरकारपर्यंत आपले मत तुम्ही पोहोचवू शकता. नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy, NEP) अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जात आहे. शालेय शिक्षण अधिक …

Read More »

NEP: शाळा ते विद्यापीठातपर्यंतच्या सर्व शिक्षक, प्राध्यापकांसाठी आनंदाची बातमी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईनवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. याच अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार प्राध्यापकांना एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (National Education Policy) शालेय स्तरावर (School level) तसेच उच्च शिक्षणाच्या स्तरावर (University Level) शिक्षक प्रशिक्षणाला (Teachers Training) विशेष महत्त्व देण्यात आले …

Read More »

मस्तच! विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी; एकाच वेळी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकता येणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीआगामी शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता एका किंवा दोन वेगवेगळ्या विद्यापीठांतून एकाच वेळी दोन पदव्या (Double Degree) मिळविणे शक्य होणार आहे. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून दोन पूर्णवेळ पदवी परीक्षांचा अभ्यासक्रम शिकता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष एम. जगदेशकुमार यांनी मंगळवारी या निर्णयाची माहिती दिली. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP) विद्यार्थ्यांना एकाचवेळी …

Read More »

नव्या शैक्षणिक धोरणाचे धडे शिक्षक गिरवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेकेंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करावी, याचे धडे महापालिकेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक गिरवणार आहेत. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसाठी नवे शैक्षणिक धोरण व शैक्षणिक उपक्रमांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवारपासून (२४ मार्च) हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद राहिल्याने दोन वर्षांमध्ये शाळांमध्ये …

Read More »

पदवीनंतर थेट ‘पीएचडी’ची मुभा; UGC चा नवा प्रस्ताव

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईनवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) वेबसाइटवर प्रसिद्ध केला असून याबाबत सूचना मागविल्या आहेत. नवीन शिक्षण धोरणानुसार (NEP) पदवी शिक्षणात विद्यार्थ्यांना कोणत्याही वर्षी …

Read More »

NEP 2022: यूजीसीकडून चार वर्षीय अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचा मसुदा तयार

NEP 2022: आगामी शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून, पदवीपूर्व अभ्यासक्रमाची चौकट पूर्णपणे बदलणार आहे. देशातील सर्व विद्यापीठांमध्ये चार वर्षांचा यूजी अभ्यासक्रम सुरू होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission, UGC) नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Education Policy, NEP) चार वर्षांच्या यूजी अभ्यासक्रमासाठी विषय आणि अभ्यासक्रमांपासून क्रेडिट्सपर्यंतचा मसुदा तयार केला आहे. याला करिक्युलर फ्रेमवर्क अॅण्ड क्रेडिट सिस्टम फॉर द ईयर अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम …

Read More »

NEP: दहावीच्या अभ्यासक्रमात आर्ट्सचा समावेश? जाणून घ्या अपडेट

Art education from SSC: दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये आर्ट्स विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीने यासंदर्भातील संकेत दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, नाटक, नृत्य आणि संगीताशी जोडण्यासाठी संसदीय समितीने केंद्र सरकारला अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा या विषयावरील संसदीय स्थायी समितीने परफॉर्मिंग आणि ललित कलांचे शिक्षण सुधारण्यासाठी अनेक …

Read More »