Tag Archives: manoranjan News

पुण्यात ‘पाठक बाईं’ची पर्स चोरीला; गाडीच्या डिकीतून चोरट्यांनी केली लंपास

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरा घरात पोहोचलेल्या पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेमुळे अक्षया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता अक्षया सोबत पुण्यात एक घटना घडली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेली असता तिच्या दुचाकीच्या डिकीतील पर्स चोरट्यांनी लंपास केली. त्या पर्समध्ये ५ ते ६ हजार रुपये होते. या घटनेनंतर अक्षयाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधला आणि घटलेली घटना सांगितला. …

Read More »

“हिरोला नग्न दाखवू शकत नाही…, स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं न्यूड पोस्टरवर वक्तव्य

स्मिता पाटील यांनी ‘चक्रा’ या चित्रपटातील त्यांच्या सेमी न्यूड पोस्टरवर हे वक्तव्य केले होते. आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. सशक्त व उत्तम अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. स्मिता यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी फक्त हिंदी नाही तर बंगाली, …

Read More »

Video- उर्वशी रौतेलाच्या मानेवर लव्ह बाइटच्या खुणा? काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर बराच मोठा चाहतावर्ग असलेल्या उर्वशीच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आताही उर्वशीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यावरून उठलेल्या अफवांवर उर्वशीने संताप व्यक्त केला आहे. उर्वशीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या मानेवर दिलेल्या खुणा या लव्ह …

Read More »

तब्बल ४ वर्षांनी सोनाली बेंद्रे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक, फोटो पोस्ट करत म्हणाली…

९० च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि मनमोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेला ओळखले जाते. सोनाली बेंद्रेला चार वर्षापूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. कॅन्सरच्या उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली होती. तसेच यादरम्यान तिचे केसही गळाले होते. पण आता सोनाली कॅन्सरमधून बरी झाली आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रे तब्बल ४ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक …

Read More »

“…झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चे चाहते झाले उदयनराजे भोसले; पाहा व्हिडीओ

उदयनराजे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदयनराजे यांची हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तर त्यांना या कार्यक्रमात पाहत असताना त्यांच्या चाहत्यांनी पुष्पाचा डायलॉग म्हणण्याची विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य …

Read More »

‘मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा…’ रणबीर कपूरसोबतच्या नात्यावर आलियानं सोडलं मौन

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे चाहत्यांचं लक्ष हे दोघं लग्न कधी करतात याकडे लागून राहिलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. पण आता आलियानं या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं यावर भाष्य केलं. आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट …

Read More »

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्या पेक्षा चर्चा रंगली बाथरूमची, जाणून घ्या कारण

नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दिन कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. तर आता नवाजुद्दीन हा त्याच्या बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनने एका मुलाखतीत खुलासा केला की नव्या बंगल्याच्या डिझाइनचे काम सुरु असताना ते कसे असले पाहिजे याविषयी …

Read More »

अरुंधतीकडून घराचा हिस्सा परत घेण्यासाठी संजना आणि आई येणार एकत्र, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अरुंधती हे पात्र तर जसं सगळ्यांना आपलं आपलसं वाटायला लागलं आहे. अरुंधतीचा फक्त लूक बदलला नाही तर ती आता स्वत: च्या पायावर देखील उभी राहिली आहे. पण सध्या …

Read More »

‘तारक मेहता…’ फेम बबीताने सुरु केलं रेस्टॉरंट, अभिनय क्षेत्राला करणार रामराम?

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात मालिकेतील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मुनमुन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मुनमुनने नवीन रेस्टॉरंट सुरु …

Read More »

“मीच मूर्ख होती की त्याला दुसरी संधी दिली…”, दीपिका पदुकोणने केला एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा

दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील काही इंटिमेट सीनमुळे तिच्यावर टीकाही आली. तर काहींनी दीपिकाच्या अभिनयाचे कौतुक केले. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान नुकतंच दीपिकाची एक जुनी मुलाखत चर्चेत …

Read More »

आशुतोष देशमुख कुटुंबासमोर देणार अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची कबुली!

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अरुंधती हे पात्र तर जसं सगळ्यांना आपलं आपलसं वाटायला लागलं आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या कॉलेजच्या काळातील मित्राची म्हणजेच आशुतोष केळकर याची एण्ट्री झाली. अरुंधती रेकॉर्डिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथे आलेल्या काही अडचणींमुळे तिला आशुतोषसोबत बाहेर …

Read More »

“मी आज एक वर्षांचा…”, वाढदिवसाच्या निमित्ताने करीना कपूरने शेअर केला जेहचा खास फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचा छोटा मुलगा जेह म्हणजेच जहांगीर अली खानचा आज एक वर्षाचा झाला आहे. जेहच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत जेह आणि तैमूर दिसत आहेत. या फोटो …

Read More »

प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ४४ व्या वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत, गर्लफ्रेंडला ‘या’ कारणामुळे केलं होतं प्रपोज

काही वर्षांपूर्वी स्टार प्लसवर सुरू झालेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका बरीच गाजली होती. या मालिकेत अभिनेत्री श्वेता तिवारी मुख्य भूमिकेत दिसली होती. तर अभिनेता सिजेन खानचीही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता सिजेन खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ४४ वर्षीय सिजेन खान लवकरच त्याची गर्लफ्रेंड अफसीनसोबत लग्न करणार आहे. याच कारणाने सध्या त्याच्या नावाची सोशल मीडियावर …

Read More »

माधुरी दीक्षितच्या अमेरिकेतील घराच्या आसपास फेऱ्या मारायचे भारतीय चाहते, शेजाऱ्यांनी विचारलं…

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनं अभिनय क्षेत्रात पुन्हा दमदार एंट्री करत सर्वांची मनं जिंकली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त माधुरी दीक्षित ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी देखील काम करणार आहे. तिची बहुचर्चित वेब सीरिज ‘द फेम गेम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात तिच्यासोबत अभिनेता मानव कौलची मुख्य भूमिका आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितनं तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. ‘द क्विंट’शी बोलताना माधुरी …

Read More »

ट्विंकल खन्ना आहे ‘या’ आजाराने त्रस्त, पोस्ट करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. नुकताच ट्विंकलने केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टमध्ये तिने एका आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले आहे. ट्विंकल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती टेपने काही तरी मोजत असल्याचे …

Read More »

Video: किसिंग सीनसाठी कोस्टारला पाच वेळा…; कपिल शर्माचा नेहा धूपियाबाबत खुलासा

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत असणारा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसते. अशातच शोमध्ये येणारे पाहुणे शोला आणखी चार चाँद लावताना दिसतात. दरम्यान, कपिल शर्मा शोमधील कपिलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री नेहा धूपियाविषयी खुलासा करताना दिसत आहे. अभिनेत्री नेहा …

Read More »

ना सप्तपदी… ना निकाह… हटके अंदाजात पार पडला शिबानी- फरहानचा विवाह सोहळा!

सध्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानी यांच्या या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा त्यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होती. अखेर हा विवाहसोहळा आज पार पडला. फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून त्यांची सोशल मीडियावर जोरदार …

Read More »

‘तुम्ही मला वाईट डान्सर किंवा अभिनेत्री म्हणा पण….’ ट्रोलर्सना आलियाचं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचा सोशल मीडियावर बरंच कौतुक झालं होतं. त्यानंतर अलिकडेच या चित्रपटातील ‘ढोलिडा’ हे गाणं प्रदर्शित झालं. ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. काहींनी या गाण्यावर आलियानं केलेल्या डान्सचं कौतुक केलं तर काहींनी मात्र तिनं दीपिकाची कॉपी केल्याचं म्हणत किंवा तिला डान्स जमलेलाच …

Read More »

दोन मुली, १६ वर्षांचा संसार, जाणून घ्या का मोडलं फरहान अख्तरचं पहिलं लग्न

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. फरहान अख्तर आणि शिबानी एकमेकांना मागच्या ४ वर्षांपासून डेट करत आहेत आणि आज दोघंही लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. खंडाळा येथील फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी सप्तपदी घेणार आहे. या विवाह सोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. दरम्यान …

Read More »

मांजरेकरांच्या अडचणीत वाढ

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून मांजरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) स्थापन विशेष न्यायालयाने शुक्रवारी माहीम पोलिसांना दिले. चित्रपटातील अल्पवयीन मुलांवर चित्रित केलेल्या आक्षेपार्ह दृश्यांवरून भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी अ‍ॅड्. प्रकाश …

Read More »