Tag Archives: cricket

भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य

Womens World Cup 2022 : महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज इंग्लंडच्या महिला संघाने पराभव केला आहे. भारताचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना होता. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला आहे. प्रथम फलदांजी करताना भारतीय महिला संघ 134 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या  इंग्लंडच्या महिला संघाने केवळ 31 षटकात सहा गड्यांच्या …

Read More »

भारतीय महिला संघाची खराब सुरुवात, 24 षटकात सात बाद 86 धावा

ENG-W vs IND-W Match : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलदांजी करत असून, सुरुवात डळमळीत झाली आहे. सध्या भारतीय महिला संघाने 24 षटकात सात विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. सध्या ऋचा घोष आणि झूलन गोस्वामी खेळत …

Read More »

‘तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा’, सचिनची श्रीशांतसाठी खास पोस्ट

Sachin on Sreesanth’s Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने बुधवारी 9 मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. दरम्यान श्रीशांतच्या या निर्णय़ानंतर महान क्रिकेटपटू सचिनने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत श्रीशांतला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सचिनने श्रीशांत आणि त्याचा एका कसोटी सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, …

Read More »

ग्रेट कॅप्टन ! मिताली राजच्या नावावर नवा विक्रम, कर्णधार म्हणून ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू

मिताली महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये आज भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत दोन हात करतोय. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली असून वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचं आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने एक अनोखा विक्रम केलाय. ती महिला एकदिवसीय …

Read More »

मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् भारतानं एक उत्कृष्ट गोलंदाज गमावला,अखेर श्रीशांतची निवृत्ती

Sreesanth Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली आहे. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. श्रीशांत यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करेल असे वाटत होते. पण कोणत्याच संघाने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही. ज्यानंतर अखेर श्रीशांतने आज निवृत्ती घेतली आहे. भविष्यात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी मी निवृत्ती घेत असल्याचं श्रीशांतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. काय …

Read More »

17 वर्षाचा असताना डेब्यू करणाऱ्या पार्थिवचा वाढदिवस, इतके वर्षे खेळूनही शतकापासून पार्थिव दूरच

Happy Birthday Parthiv Patel : यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने अत्यंत कमी वयात टीम इंडियामध्ये जागा मिळवली होती. जवळपास 17 वर्षाचा असताना इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट 2002 मध्ये त्याने टेस्ट मॅच खेळली होती. त्यानंतरही त्याने काही दमदार सामने खेळले. पण तो पूर्णपणे स्वत:ला सिद्ध करु शकला नाही. कारण पार्थिवच्या पाठोपाठच संघात महेंद्र सिंह धोनीची एन्ट्री झाली आणि सर्व फॉर्मेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून धोनीने …

Read More »

Pravin Tambe : 41 व्या वर्षी IPL च्या मैदानात, आता कारकिर्दीवर सिनेमा, कोण आहे प्रवीण तांबे?

Pravin Tambe : क्रिकेटवेड्या भारतात अगदी लहाणांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण क्रिकेटसाठी वेडे आहेत. क्रिकेट बघणाऱ्यांप्रमाणे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर अशाच भारतात अगदी 16 वर्षाचा असताना सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज पदार्पण करत असेल तर 41 वर्षाच्या वयातही एक खेळाडू पदार्पण करताना दिसून आला आहे. हा खेळाडू म्हणजे लेग स्पीनर प्रवीण तांबे.  शिवाजी पार्कच्या मैदानात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या प्रवीणची हीच कथा आता सिनेमाच्या …

Read More »

शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकारानं? मृत्यूपूर्वीच्या काही तासांसंदर्भात मित्रानं दिली महत्त्वाची म

Shane Warne : क्रिकेट जगतात फिरकीचा जादुगार म्हणून ख्याती असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) याचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं वॉर्नचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेन वॉर्नचा मृत्यूबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फॉक्स स्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, जगविख्यात लेग स्पिनर शेन वॉर्न थायलँडच्या कोह सामुईमध्ये होता. असं सांगण्यात येत आहे की, …

Read More »

IND Vs SL 1st Test Match: श्रीलंकेला धूळ चारली ! पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा एक डाव २२२ धावांनी विजय

मोहाली येथे झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी समना अनेक अंगांनी चर्चेचा विषय ठऱला. भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयासाठी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठे योगदान दिले. १७५ धावा करुन त्याने भारताचा धावफलक ५७४ पर्यंत नेऊन ठेवला. तसेच गोलंदाजीमध्येही त्याने ९ बळी घेऊन भारतासाठी विजय आणखी सोपा केला. भारताने या विजयासह श्रीलंकेविरोधात १-० …

Read More »

IND Vs PAK : भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय, पाकला चारली धूळ

एकदिवसीय महिला विश्वचषकासाठीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केलीय. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचं तगडं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाची चांगलीच दमछाक झाली. पाकिस्तानला अवघ्या १३७ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरोधातील विजयाची मालिका सुरुच ठेवल्याने या धडाकेबाज कामगिरीचं कौतूक केलं जातंय. भारताने …

Read More »

IND Vs PAK : स्नेह -पूजा जोडीने भारताला तारलं, पाकिस्तानपुढे २४५ धावांचं आव्हान उभं करताना केला अनोखा विक्रम

बे ओव्हल येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकदिवसीय महिला विश्वचषक सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले आहे. २४४ धावांचा हा डोंगर उभारताना स्नेह राणा, पूजा वस्त्रकर या जोडीने दमदार कामगिरी केली. भारतीय संघ वाईट स्थितीत असताना या जोडीने सातव्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. ही धमाकेदार कामगिरी करताना या जोडीने नवा विक्रम केलाय. ३३ षटकांत …

Read More »

IND Vs PAK : स्नेहा, पूजाने भारताला सावरलं, पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य

आयसीसी एकदीवसीय महिला विश्वचषकातमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्मृती मंधाना (५२), स्नेह राणा, पूजा वस्त्रकर यांनी अर्धशतकी खेळ खेळत भारतीय संघाला सावरले. आजचा सामना खिशात घालून विजयी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ पाकिस्तानशी दोन हात करतोय. मागील काही दिवसांपासून भारतीय …

Read More »

IND Vs SL 1st Test Match : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंका ४६६ धावांनी पिछाडीवर, जडेजाने केल्या १७५ धावा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळला जातोय. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस होता. आजच्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय फलंदाजांनी आज नेत्रदीपक कामगिरी केली. भारताने ५७४ धावांवर डाव घोषित केला. तर दिवसाअखेर श्रीलंकेची स्थिती चार गडी बाद १०८ धावा अशी राहिली. आजच्या खेळात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत तब्बल १७५ धावा …

Read More »

विश्लेषण : शेन वॉर्न का ठरतो क्रिकेटमधील महानतम फिरकी गोलंदाज?

– सिद्धार्थ खांडेकर ऑस्ट्रेलियाचा विख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने अवघ्या ५२व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे जगभरचे तमाम क्रिकेटप्रेमी हळहळले आहेत. नव्वदच्या दशकात आणि २०००मधील पहिल्या दशकात वॉर्नच्या जादुई फिरकीने क्रिकेटमधील या नजाकती कौशल्याला संजीवनी मिळाली असे म्हणावे लागेल. सातशेहून अधिक कसोटी बळी आणि त्यांतील अनेक बळींच्या मागे दडलेली नाट्यमयता, तसेच अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहूनही सर्व प्रकारच्या क्रिकेटवर – कसोटी ते …

Read More »

शेन वॉर्नसाठी भारत राहिला कायमच खास; पदार्पणापासून ते आयपीएलच्या पहिल्या जेतेपदापर्यंत

क्रिकेट चाहत्यांसाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आता या जगात नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ वर्षीय वॉर्नचा थायलंडमधील कोह सामुई येथे मृत्यू झाला. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. १४५ कसोटी सामन्यात …

Read More »

Blog : 90’s Kids… क्रिकेट… अन् शेन वॉर्न…

स्वप्निल घंगाळे शेन वॉर्नचं निधन झाल्याचं कळतंय… असा मेसेज ऑफिसच्या ग्रुपवर पाहिला आणि मोर्चा लगेच ट्विटरकडे वळवला तर बातमी खरी निघाली… खरं तर त्याला ना कधी भेटलो, ना त्याचे रेकॉर्ड तोंडपाठ आहेत ना मी ऑस्ट्रेलियन टीमचा चाहता आहे. पण त्याच्या निधनाच्या बातमीने इतर सेलिब्रिटी डेथच्या बातम्यांप्रमाणे पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली की आयुष्य फारच अनसर्टन आहे…. दुसरा त्याहून महत्वाची …

Read More »

Shane Warne Died : युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांवर शेन वॉर्नने दिली होती प्रतिक्रिया, म्हटले होते की…

जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेकांनी शेन वॉर्नच्या निधानवर शोक व्यक्त केला आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे आज वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेट जगातीशी निगडीत असलेल्या तसेच अन्य क्षेत्रांमधील व्यक्तींनी देखील शेन वॉर्नच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नने आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया- …

Read More »

“कोहलीमुळे कसोटी क्रिकेट सुरक्षित”; जेव्हा शेन वॉर्नने केले होते विराटचे कौतुक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने एक संक्षिप्त निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांचा थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. …

Read More »

Shane Warne Died : शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा ; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सेहवागसह अनेकांकडून शोक व्यक

शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची …

Read More »

जेव्हा शेन वॉर्नने आपल्या एका चेंडूने जगाला केले होते थक्क; जाणून घ्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ बद्दल

मी असा चेंडू टाकू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते, असे वॉर्नने म्हटले होते ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी  निधन झाले आहे. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे त्याच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. …

Read More »