Tag Archives: भारत

रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा ‘हा’ विक्रम मोडला

IND vs SL, 1st Test, Mohali : मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. हा दुसरा दिवस गाजवला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने. रविंद्र जडेजाने 175 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला आहे. दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावावर एक नवा विक्रम …

Read More »

पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद

IND vs SL, 1st Test, Mohali: भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारताने सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या आहेत. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला आहे. आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे. मोहाली येथे भार विरुद्ध श्रीलंका …

Read More »

१०० व्या कसोटी सामन्यापूर्वी मिळालेल्या सन्मानावेळी विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना, “माझ्यासाठी हा खास क्षण”

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीची कारकीर्द आजवर अनेक चढउतारांमधून गेली आहे. भारतीय भूमीवर चांगली …

Read More »

आजापासून महिला क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियाला भिडणार पाकिस्तानला

Women’s World Cup : आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात (ICC Womens Cricket World Cup 2022) होणार आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. विश्वचषकाचा सलामीचा सामना स्पर्धेचं यजमान असलेल्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात आठ संघांमध्ये 27 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रकानुसार, चार …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात रोहितचा आणखी एक पराक्रम

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्माशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाची नोंद केलीय. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचलाय. हा विक्रम पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक याच्या नावावर होता. धर्मशाला येथील रोहितचा 125वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. तो जगातील …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यातून ईशान किशन बाहेर

IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर, भारतीय संघाचा सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) अखेरच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट स्डेडिअमवर …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल.  …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माची विक्रमाला गवसणी

Rohit Sharma: भारतानं दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर विकेट्स राखून विजय मिळवला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं 184 धावांचे लक्ष्य भारतानं 17.1 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झालीय. रोहित शर्माची विक्रमाला गवसणी– रोहित शर्माने सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या शोएब मलिकच्या विक्रमाची बरोबरी …

Read More »

IND vs SL : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी हरवले

IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना सात गड्यांनी जिंकला आहे. श्रीलंका संघाने दिलेले 184 धावांचे आव्हान भारतीय संघाने 18 व्या षटकातच तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याची मालिकेक 2-0 च्या फरकाने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघाने श्रीलंका संघाचाही मालिकेत पराभव केला आहे. भारतीय संघाचा …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास; मॉर्गन, विलियमसनला टाकणार मागे

<p><strong>IND Vs SL:</strong> भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्यासामन्यात भारतानं श्रीलंकेला 62 धावांनी पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील दुसरा सामना आज धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडं इतिहास रचण्याची संधी आहे.&nbsp;</p> <p>रोहित शर्माला उत्तम कर्णधार म्हणून ओळखले …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना परवानगी

IND Vs SL: तीन सामन्याची टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारत- श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. बंगळुरू येथे खेळला जाणाऱ्या या डे-नाईट सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलीय. बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50% प्रेक्षक …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज; कधी, कुठे आणि कसा पाहायचा?

IND vs SL, 1st T20 Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (24 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकतंच भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघाला टी-20 मालिकेत 3-0 नं पराभूत केलंय. तर, श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियावरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून 4-1 असा …

Read More »

IND vs SL, 1st T20: सूर्यकुमार, दीपक चाहर दुखापतग्रस्त, कशी असेल टीम इंडियाची अंतिम 11?

IND vs SL, 1st T20: काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामने खेळण्यासाठी आली असून आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आज पहिला सामना लखनौच्या मैदानात खेळवला जाणार असून यावेळी संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याची सर्वाधिक उत्सुकता आहे. कारण …

Read More »

सूर्यकुमार स्पर्धेबाहेर जाताच श्रीलंकेचाही महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित,टी20 मालिकेला मुकणार

IND vs SL : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेलाही एक झटका बसला असून श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली असून अजून तो पूर्णपणे ठिक झाला …

Read More »

भारतानं गेल्या 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावल्या

Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या न्यूझीलंडविरुद्ध चौथा एकदिवसीय सामना खेळणार आहे. पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताला पहिल्या 3 सामन्यात पराभव पत्कारवा लागलाय. तसेच न्यूझीलंडच्या संघानं मालिकेत 3-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केलाय. भारतीय संघानं मागील 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावलीय. भारताला न्यूझीलंडअगोदर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारवा लागलाय. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकमेव …

Read More »

वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्ध सज्ज, कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?

IND vs SL, 1st T20: नुकतंच भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामना खेळण्यासाठी येणार आहे. दरम्यान तीन टी20 मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं आहे. दरम्यान संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याची सर्वाधिक उत्सुकता असेल. तसंच आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने हा दौरा संघ …

Read More »

भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, कोणाला मिळाली संधी?

IND Vs SL T20 Series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेनं संघ जाहीर केलाय. भारत दौऱ्यावर दसुन शनका टी-20 मालिकेचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेच्या जाहीर केलेल्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यात दिनेश चंडीमल, चरिथ असलंका आणि कुशल मेन्डिसचाही समावेश आहे.  भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना …

Read More »

सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 31 चेंडूत ठोकल्या 65 धावा

IND vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 185 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तुफानी खेळी करत सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एकेकाळी भारताची धावसंख्या दिडशे पार जाईल की नाही? असं …

Read More »

आवेश खानचं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, ऋतुराज गायकवाडलाही संधी

India vs West Indies: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात भारतानं युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात संधी देण्यात दिलीय. या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आवेश हा भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदापर्ण करणारा भारताचा 96 वा खेळाडू ठरलाय.  भारताचा कर्णधार रोहित शर्मानं …

Read More »

वृद्धीमान साहाला पत्रकाराकडून धमकी, ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर भारतीय यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. साहाला व्हॉट्सअॅपवर एका पत्रकाराकडून ही धमकी मिळाली आहे, ज्याचा स्क्रीनशॉट साहानं सोशल मीडियावर शेअर केलाय. पत्रकार त्याला मुलाखतीसाठी धमकावत असल्याचं साहाचे मत आहे. “भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर एका ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. पत्रकारिता इथेच संपते, असंही साहानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. …

Read More »