आवेश खानचं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, ऋतुराज गायकवाडलाही संधी

India vs West Indies: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात भारतानं युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात संधी देण्यात दिलीय. या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आवेश हा भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदापर्ण करणारा भारताचा 96 वा खेळाडू ठरलाय. 

भारताचा कर्णधार रोहित शर्मानं संघात चार बदल केले आहेत. भारताच्या संघात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि आवेश खान सामील करण्यात आलंय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच अखरेच्या टी-20 सामन्यात युवा फलंदाज कशी कामगिरी करतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

विराट कोहली, ऋषभपंतला विश्रांती
भारताला कोलकात्याच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात विराट कोहली आणि ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलीय. कोहलीला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून ब्रेक देण्यात आलाय, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलीय. विराट कोहलीनं वेस्ट इंडीजद विरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत.

हेही वाचा :  न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

संघ-

भारताचा संघ-
ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान

वेस्ट इंडीजचा संघ- 
काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी वाईट बातमी, महत्त्वाचा खेळाडू मॅक्सवेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Glenn Maxwell, IPL 2023 : क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आयपीएल 2023 अगदी जवळ आली आहे. स्पर्धेला …

Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

Nitu Ganghas Wins Gold in Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास …