Tag Archives: भारत

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये सूर्यादादाची हवा, अव्वल स्थानी कायम

Suryakumar Yadav No.1 T20I Batter : भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्वात दमदार फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज म्हणून अजूनही कायम आहे. आयसीसीने (ICC Ranking) जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान आहे. सूर्याच्या नावावर 890 गुण आहेत. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 836 गुण आहेत. सूर्यकुमार यादवने …

Read More »

टीम साऊदीनं भारताविरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकनं दमदार रेकॉर्ड केला नावावर, टी20 सामन्यांत अफलातून

Tim Southee Record in India vs New Zeland T20 : न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत हॅट्रीक घेतली. अखेरच्या षटकांत त्याने केवळ 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने या हॅट्रीकसह आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात (hat trick in t20) दुसरी हॅट्रीक घेतली आहे. लसिथ मलिंगानंतर (lasith Malinga) अशी कामगिरी …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेत कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

IND vs NZ Head to Head Records: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. परंतु, पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) माउंट मॉन्गनुई स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 …

Read More »

Edwina Mountbatten : कोण होत्या लेडी माऊंटबॅटन, नेहरुंसोबत काय होतं त्यांचं नातं?

Edwina Mountbatten : ‘एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केल्याचा खळबळजनक आरोप रणजीत सावरकरांनी नेहरूंवर केला. लेडी माऊंटबॅट, अर्थात एडविना माऊंटबॅटन (Edwina Mountbatten) यांच्यासाठी नेहरूंनी भारताचा विश्वासघात केल्याचाही आरोप त्यांनी केला. (India) भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १२ वर्षे नेहरूंनी (Pandit jawaharlal nehru) लेडी माऊंटबॅटन यांच्या सांगण्यावरून देशाची गुप्त माहिती ब्रिटीशांना (Britishers) पुरवल्याचा दावाही रणजीत सावरकरांनी केला. ज्यानंतर एकाएकी (Edwina Mountbatten ) …

Read More »

ना सिमेंट, ना कसलं बांधकाम तरीही कसा टिकून आहे पूल? बातमी कमाल Interesting

India News : पूल…. किंवा ब्रिज (Bridge). गेल्या काही वर्षांपासून त्यांचं महत्त्वं एकाएकी वाढलं. प्रवासात वेळ वाचवणारा, प्रवास सुकर करणारा असा हा पूल. आज जगात असे असंख्य पूल आहेत ज्यांच्यामुळं विविध ठिकाणांवर पोहोचणं अगदी सोपं झालं आहे. भारताचंच म्हणाल, तर देशाच्या कानाकोपऱ्यातही पोहोचण्यासाठी पुलांचा वापर केला जात आहे. हिमाचल (Himachal Pradesh), काश्मीर (Kashmir) भागात सैन्यानं तयार केलेले लोखंडी पूल, तर …

Read More »

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचे अनेक फायदे; न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी लक्ष्मणनं म्हणाला…

India Tour Of New Zealand: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची टी-20 आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, सलामीवीर शिखर धवनकडं (Shikhar Dhawan)  एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं गेलं आहे. याशिवाय, भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS …

Read More »

न्यूझीलंडचे गोलंदाज समोर येताच तळपते रोहितची बॅट; टी20 मालिकेत भारताकडून ठोकल्यात सर्वाधिक धावा

India Tour of New Zealand: टी-20 विश्वचषकातील पराभवाची खपली भरून काढण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडसोबत (IND vs NZ)  तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या …

Read More »

सूर्याची चमक कायम; टी-20 रँकिंगमध्ये अजूनही अव्वल स्थानी

ICC T20 Rankings: टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) चमकदार खेळी करून दाखवली. ज्याचा फायदा त्याला टी-20 रँकिंगमध्ये मिळाला. आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 फलंदाजाच्या ताज्या क्रमावारीनुसार, सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवचे 859 गुण आहेत. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात सूर्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याचं रँकिंगमध्ये 10 गुणांचं नुकसान झालं.पण तरीही सूर्यकुमार यादव आपलं स्थान …

Read More »

‘आम्हाला काही सिद्ध करण्याची गरज नाही’ हार्दिक पांड्याचं मायकेल वॉनला प्रत्युत्तर

Hardik Pandya On Michael Vaughan: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह भारताचे फायनल गाठण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले. यादरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं (Michael Vaughan) भारताच्या कामगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानं भारताला इतिहासातील सर्वात अंडर परफॉर्मिंग टीम म्हटलंय. दरम्यान, मायकल वॉनच्या वक्तव्यावर भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक (Hardik pandya) पांड्यांनं प्रत्युत्तर …

Read More »

न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार; रोहित, विराटसह सात खेळाडूंना विश्रांती

India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह सात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती …

Read More »

वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीपासून विदेशी टी-20 लीग पर्यंत; राहुल द्रविडच्या पत्रकार परिषदेतील मह

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला (IND vs ENG) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागलं. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 10 विकेट्स राखून हा सामना जिंकला. भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी भारताच्या वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीपासून तर भारतीयांचं विदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याबाबत राहुल द्रविडनं भाष्य केलं. ट्वीट- #TeamIndia put up a fight …

Read More »

भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची पाच कारणं

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) वादळी खेळी भारतासाठी सेमीफानयलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये …

Read More »

इंग्लंडचे ‘हे’ पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा (PAN vs NZ) सात विकेट्सनं धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिलीय. त्यानंतर आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)  यांच्यात या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वाजता अॅडिलेड मैदानावर  खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघानं दमदार कामगिरी बजावलीय आहे. यामुळं आजचा …

Read More »

इंग्लंडची ताकद वाढणार! स्टार ऑलराऊंडरची संघात एन्ट्री, भारताविरुद्ध घेतलेत सर्वाधिक विकेट्स

T20 World Cup semifinal 2: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अॅडिलेट ओव्हल मैदानावर (Adelaide Oval) खेळला जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) दुखापतीमुळं भारताविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याऐवजी संघाचा स्टार ऑलराऊंडर क्रिस जॉर्डनला (Chris Jordan) संधी दिली जाणार असल्याची …

Read More »

पाकिस्ताननं 1992 साली जिंकलाय पहिला विश्वचषक, यंदाही तशीच पाच आश्चर्यकारक योगायोग

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला सात विकेट्सनं नमवत फायनलमध्ये धडक दिलीय. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानच्या संघानं उर्वरित तीन सामन्यात चांगली कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफानयलचं तिकीट मिळवून देण्यास नेदरलँड्सच्या संघाची भूमिका महत्वाची ठरली. सुपर 12 फेरीच्या ग्रुप ‘2’ मधून भारतासह दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार …

Read More »

भारत- पाकिस्तानमध्ये फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनलपूर्वी जोस बटलरचा इशारा

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा अंतिम टप्प्यात आलाय. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल खेळला जातोय. तर, भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) भारत आणि पाकिस्तान यांच्या चाहत्यांना इशारा दिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल …

Read More »

भारत-पाकिस्तान फायनल पाहण्यासाठी उत्सूक- शेन वॉटसन

T20 World Cup Final 2022: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा आतापर्यंत थरारक ठरली. या स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील अनेक सामने रोमहर्षक ठरले. भारत (India), पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामना आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना ठरला. यानंतर …

Read More »

लाईव्ह सामन्यात रोहितला भेटण्यासाठी चाहत्याची मैदानात एन्ट्री; पण पुढं काय घडलं? नक्की बघा

T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात आज मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं झिम्ब्बावेचा 71 धावांनी पराभव करत आठ गुणांसह सेमीफायनलमध्ये धडक दिली. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्बे यांच्यात 10 नोव्हेंबरला टी-20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलची पहिली लढत …

Read More »

सूर्यकुमारच्या तडाखेबाज फलंदाजीनं रोहित शर्मा भलताच खूश, झिम्बाब्वेविरुद्ध विजयानंतर म्हणाला…

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा (IND vs ZIM) 71 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं या विजयासह भारतीय संघ गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल ठरला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) सेमीफायनल सामना खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा …

Read More »

ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा जावई, गर्लफ्रेन्ड विनी रमनशी बांधली लग्नगाठ

Glenn Maxwell marries Vini Raman: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लग्न बंधनात अडकलाय. ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केलंय. मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न 18 मार्च म्हणजेच होळीला एका खाजगी समारंभात झालाय. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय.  इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली लग्नाची माहितीग्लेन मॅक्सवेल व विनी रमण …

Read More »