ना सिमेंट, ना कसलं बांधकाम तरीही कसा टिकून आहे पूल? बातमी कमाल Interesting

India News : पूल…. किंवा ब्रिज (Bridge). गेल्या काही वर्षांपासून त्यांचं महत्त्वं एकाएकी वाढलं. प्रवासात वेळ वाचवणारा, प्रवास सुकर करणारा असा हा पूल. आज जगात असे असंख्य पूल आहेत ज्यांच्यामुळं विविध ठिकाणांवर पोहोचणं अगदी सोपं झालं आहे. भारताचंच म्हणाल, तर देशाच्या कानाकोपऱ्यातही पोहोचण्यासाठी पुलांचा वापर केला जात आहे. हिमाचल (Himachal Pradesh), काश्मीर (Kashmir) भागात सैन्यानं तयार केलेले लोखंडी पूल, तर शहरांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले पूल पाहताना किंवा त्यावरून प्रवास करताना डोळे एकदातरी विस्फारतात. 

आपल्या देशातच आहे असा एक अविस्मरणीय पूल…. 

(Cement) सिमेंट- काँक्रिटचा वापर नाही, कोणतंही मोठं बांधकाम नाही. तरीही (Meghalaya) मेघालयमध्ये  Rubber fig tree च्या मुळांपासून हा पूल नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. झाडांची मुळं इथे एकमेकांमध्ये अशा पद्धतीनं रुतली आहेत की त्यांना वेगळं करणंही अशक्यच. बरं, गेल्या बऱ्याच वर्षांपासून हे भलेमोठे वृक्ष त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांची मुळं आता प्रचंड टणक आणि तितकीच भक्कम झाली आहेत. इतकी, की त्यावरून तुम्ही अगदी सहजपणे एका बाजूनं दुसऱ्या बाजुला जाऊ शकता. 

हेही वाचा :  महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

या living root bridge जवळ कसं पोहोचावं? 

जर तुम्हाला मेघालयमध्ये असणाऱ्या सिंगल डेकर living root bridge पाशी पोहोचायचं असेल, तर Riwai या गावात पोहोचून तुम्ही हा पूल पाहू शकता. शिलाँगपासून हे गाव साधारण 76 किमी अंतरावर आहे. रस्तेमार्गानं तुम्ही तिथं शिलाँगहून 2 ते अडीच तासांमध्ये पोहोचू शकता. 

मेघालयमध्येच तुम्हाला double-decker living root bridge सुद्धा पाहता येईल. हा पूल चेरापूंजीपासून 13 किमी अंतरावर असणाऱ्या नॉनग्रिआत या गावात आहे. इथं चेरापुंजीहून पोहोचण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला एक 3000 पायऱ्या आणि काहीशा अवघड पण तितक्याच सुरेख वाटेचा ट्रेक करावा लागतो. 

Meghalaya

मेघालयमध्ये पर्यटनासाठीचे बरेच पर्याय (Meghalaya Tourism)

संपूर्ण जगाला आश्चर्यच वाटणारे हे पूल असण्यासोबतच मेघालयमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं इतरही बरीच ठिकाणं आहेत. बऱ्याच Travel Groups, Adventure Groups च्या माध्यमातून तुम्ही इथं पोहोचू शकता आणि मुख्य म्हणजे एकाच भेटीत तुम्ही या दोन्ही पुलांनाही भेट देऊ शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …