Tag Archives: आयपीएल

IPL 2022, SRH vs RR Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात 15 व्या हंगामाचा पहिला सामना होत आहे. संजू सॅमसनपुढे अनुभवी केन विल्यमसनचे आव्हान आहे. हैद्राबादने या आधी दोन वेळा जेतेपद पटकावलं असून राजस्थानने पहिलं वहिलं आयपीएलचं टायटल पटकावलं होतं. पण मागील काही वर्षात दोन्ही संघाकडून सुमार खेळ दिसत आहे. त्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करणार …

Read More »

गुजरातने राहुलसाठी 9 कोटी खर्च केल्यावर प्रश्न उठवणाऱ्यांना सेहवागचं उत्तर, म्हणाला…

GT vs LSG : मंगळवारी मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स सामन्यात गुजरातने राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर लखनौवर पाच विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान राहुल तेवतिया याने पुन्हा एकदा आयपीएलमधील तो एक दमदार खेळाडू असल्याचं दाखवून दिलं. यंदा त्याला गुजरात संघाने 9 कोटी देऊन विकत घेतलं होतं. त्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण राहुलने पहिल्याच सामन्यातील …

Read More »

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

SRH vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) चा पाचवा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असा रंगणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यापूर्वी याआधीचा रेकॉर्डवर एक नजर फिरवूया… हैदराबाद विरुद्ध राजस्थान …

Read More »

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोणते शिलेदार उतरणार मैदानात?,अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs RR : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबादचा संघ (RR vs SRH) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (MCA) आमने-सामने असणार आहेत. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हैदराबाद संघाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि राशिद खान आता संघात नसून राजस्थानच्या ताफ्यातून देखील काही स्टार खेळाडू निसटले आहेत. पण …

Read More »

भावाने घेतली भावाची विकेट, कृणालने हार्दिकला बाद करताच दिली हटके रिएक्शन, पाहा व्हिडीओ

Krunal Pandya Out Hardik Pandya: मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) चौथ्या सामन्यात लखनौकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने त्याचाच भाऊ आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केलं. दरम्यान या विकेटनंतर कृणाल, हार्दिक तसंत हार्दिकची पत्नी नताशा अशा साऱ्यांच्याच रिएक्शन्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. संघाला विजयाची गरज असताना हार्दिक …

Read More »

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs RR : आयपीएलच्या सामन्यांमध्ये अवघ्या दोन दिवसांत रंगत दिसू लागली आहे. सोमवारी झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या नव्या दोन संघातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. ज्यानंतर आता आज देखील एका दमदार सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा असून राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH vs RR) या संघामध्ये आज सामना पाहायला मिळणार आहे. राजस्थानची भिस्त यंदाही …

Read More »

मैदान IPL चं, लक्ष्य विश्वचषकाचं, 11 खेळाडूंचं नशिब पालटणारी स्पर्धा, कोणाला संधी, कोण आऊट?

IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. दहा संघ तब्बल दोन महिने एकमेंकाशी स्पर्धा करणार आहेत. पण आयपीएल स्पर्धा असली तरी भारतीय संघव्यवस्थापन (Team India) या स्पर्धेकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कारण, वर्षाअखेर टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी (T 20 World cup) भारताच्या संघात काही खेळाडूंना आयपीएलमधील कामगिरीतून संधी मिळणार …

Read More »

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयपीएलच्या 15 हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या …

Read More »

IPL 2022: गुजरात टायटन्स संघ व्यवस्थापनाकडून नवी अपडेट, सामन्यापूर्वी राशिद खानवर मोठी जबाबदारी

IPL 2022, GT vs LSG : गुजरात टायटन्स आपल्या IPL सामन्यांची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असून हार्दीकसह राशिद आणि शुभमन हे स्टार खेळाडू संघात आहेत. महालिलावात गुजरातने आणखी काही महारथीही संघात घेतले आहेत. दरम्यान स्टार खेळाडू राशिदवर नुकतीच संघाने …

Read More »

IPL 2022 : यंदाच्या हंगामातील पहिली अप्रतिम कॅच, दिल्लीच्या सायफर्टने टीपलेला ‘हा’ झेल पाहाच

DC Vs MI : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलं. मुंबईच्या संघानं दिलेलं 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ईशान किशनला तुफानी खेळी केली पण अक्षरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एक अप्रतिम कॅच देखील पाहायला मिळाली. मुंबईचा …

Read More »

गुजरात विरुद्ध लखनौ सामन्याला कोणते खेळाडू मुकणार?, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

IPL 2022, GT vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत सोमवारी लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ मैदानात उतरणार असून दोन्ही संघाचा आयपीएलमधील हा पहिलाच सामना असेल. दोन्ही संघानी महालिलावात अनेक तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात सामिल केले आहेत. त्यामुळे आजची ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही. पण या लढतीत काही खेळाडूंना विविध कारणांमुळे खेळता येणार …

Read More »

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स मैदानात, ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वाची नजर

IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या हंगामात यंदा नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सामिल झाले असून आज त्यांचा पहिलाच सामना आहे. गुजरात संघाची कमान विस्फोटक ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे तर लखनौची जबाबदारी केएल राहुलकडे असणार आहे. आयपीएलच्या महालिलावात या दोन्ही संघानी …

Read More »

नवे संघ, नव्या रुपात अवतरणार मैदानात, गुजरात विरुद्ध लखनौची लढत, कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर …

Read More »

DC vs MI : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

IPL 2022 DC vs MI : आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मोठे लक्ष्य असतानाही मुंबईचा रोमांचकारी पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. …

Read More »

आरसीबीविरुद्ध रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय, 206 धावांचं लक्ष्य 6 बॉल राखून गाठलं

IPL 2022: मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 5 विकेट्सनं परभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत …

Read More »

इलेक्ट्रिशियनचा मुलगा कसा बनला क्रिकेटर? वाचा मुंबईचा फलंदाज तिलक वर्माच्या संघर्षमय कहाणी

IPL 2022: भारताचा अनकॅप युवा क्रिकेटपटू तिलक वर्मानं (Tilak Varma) मुंबईच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदापर्ण केलंय. 19 वर्षाच्या तिलक वर्माचं मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धनं खुलेपणाने कौतुक केलं होतं.आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिलक वर्माची जोरदार चर्चा रंगली होती. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये मुंबईनं त्याला 1.70 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिलक वर्माला आयपीएल 2022 मध्ये …

Read More »

कोलकाता विरुद्ध ड्वेन ब्राव्होची दमदार कागगिरी, लसिथ मलिंगाच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हगामची सुरुवात झालीय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता (CSK Vs KKR) यांच्यात रंगला. या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात तीन विकेट्स घेऊन ब्राव्होनं श्रीलंकेचा माजी खेळाडू मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केलीय.  लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी ब्राव्होने कोलकाताविरुद्ध सामन्यात 4 षटकात  20 …

Read More »

IPL 2022 : यंदातरी ‘आयपीएल’च्या सुरक्षेचे पैसे मुंबई पोलिसांना मिळणार का?

IPL 2022 : संपूर्ण जगाला भूरळ घालणारी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). जगभरातल्या आजी माजी स्टार खेळाडूंचा भरणा आयपीएलमध्ये असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण आयपीएल मुंबई आणि आसपासच्या परीसरात आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे पालक संघटना या नात्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशन सध्या कमालीचं व्यस्त असणं स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे मुंबई पोलिसांवरही सुरक्षा व्यवस्थेचा प्रचंड ताण पडणार आहे. गणपती, …

Read More »

आज दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत आमने सामने

IPL 2022 Delhi vs Mumbai : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सीझनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे. कारण आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात होणार आहे. तर दुसरा पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (PBKS vs RCB) यांच्यात होणार आहे. …

Read More »

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना पंजाब किंग्जशी, विराटच्या कामगिरीकडं सर्वांच्या नजरा

IPL 2022 Punjab vs Bangalore : आज आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. ही आयपीएलमधील तिसरा सामना आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या फलंदाजीकडे असणार आहेत. कारण कर्णधारपद सोडल्यानंतर आता दडपणमुक्त खेळणार आहे. त्यामुळं तो कशी खेळी करणार याकडं चाहत्यांचं लक्ष लागलंय. या सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिस …

Read More »