IPL 2022: गुजरात टायटन्स संघ व्यवस्थापनाकडून नवी अपडेट, सामन्यापूर्वी राशिद खानवर मोठी जबाबदारी

IPL 2022, GT vs LSG : गुजरात टायटन्स आपल्या IPL सामन्यांची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असून हार्दीकसह राशिद आणि शुभमन हे स्टार खेळाडू संघात आहेत. महालिलावात गुजरातने आणखी काही महारथीही संघात घेतले आहेत. दरम्यान स्टार खेळाडू राशिदवर नुकतीच संघाने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला संघाचा उपकर्णधार ही जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन ही माहिती शेअर केली आहे.

गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हार्दीक आणि राशिदचा (Rashid Khan) फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘आमच्यासाठी या हंगामात राशिद खान उपकर्णधार असणार आहे.’ गुजरातने महालिलावापूर्वीच तब्बल 15 कोटी मोजत राशिदला संघासाठी करारबद्ध केलं होतं.  




“>

शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये

हेही वाचा :  तब्बल 26 महिन्यानंतर पृथ्वी शॉला संघात मिळालं स्थान, 'ही' खेळी ठरली कारण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …