सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

SRH vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) चा पाचवा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असा रंगणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यापूर्वी याआधीचा रेकॉर्डवर एक नजर फिरवूया…

हैदराबाद विरुद्ध राजस्थान Head to Head

आयपीएलच्या 15 सामन्यात आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आजवर तरी अटीतटीची लढत दिसून आली आहे. ज्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही. मागील सीजनचा विचार करता दोन सामने या संघामध्ये आपआपसांत झाले होते. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला होता.

या खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर

राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करता जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या स्फोटक फलंदाजांवर सर्वांची नजर असेल. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनीची कामगिरी पाहण्याजोगी असेल. दुसरीकडे हैदराबाद संघाचा विचार करता राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि कर्णधार केन विल्यमसन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल. 

हेही वाचा :  'एका पर्वाचा अंत, धोनीची कप्तानी चाहते कधीच विसरणार नाही', विराटची इमोशनल पोस्ट

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …