स्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्…; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

Viral Car Video: हल्ली सोशल मीडियावरुन अल्पावधीत लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणाही लोक रिल्स आणि व्हिडीओ शूट करण्याच्या नादात करताना दिसतात. या वेडेपणामुळे ते स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालतात. अशा वेडेपणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरतात. यातही काहीजण अगदी प्रशिक्षण घेऊन व्हिडीओ शूट करणारे असतात तर काहीजण स्टंटबाजीच्या माध्यमातून लोकांनी आपली दखल घ्यावी यासाठी धडपडत असतात. अनेकदा तर यावर वेबसिरीज आणि युट्यूबवरील व्हिडीओंचा प्रबाव असल्याचं दिसून येतं. खास करुन रस्त्यावरील स्टंटबाजीमध्ये चित्रपटांमधील सीन्सची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसतं. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला. 

नक्की घडलं काय?

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील स्टंटबाजीचा व्हिडीओ एक्सवर (ट्वीटरवर) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गाड्यांचा एक ताफा नोएडामधील सेक्टर 37 वरुन सिटी सेंटरला जाताना दिसत होता. भरधाव वेगात जाणाऱ्या या गाड्यांच्या सनरुफबरोबरच खिडकीमधून बाहेर डोकावत गाडीमधील प्रवासी नोटा दाखवत होते. या ताफ्यात एकूण 5 कार होत्या. ज्यामध्ये एसयूव्ही, हॅचबॅक कार्सचा समावेश होता. या कारमधून नेमक्या कशासाठी नोटा दाखवल्या जात होत्या हे स्पष्ट झालं नाही. मात्र एका कारमधील व्यक्तींनी 20 रुपयांच्या अनेक नोटा धावत्या कारमधून रस्त्यावर फेकल्याचं दिसून आलं. 

पोलिसांनी काही तासात शोधून काढल्या गाड्या

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याची दखल नोएडा वाहतूक पोलिसांनी घेतली. सोशल मीडिया तसेच सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून पोलिसांनी या कार्सचा शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये त्यांनी या कारचालकांना शोधून काढलं. या सर्वांकडून प्रत्येकी 33 हजार रुपये दंड आकारण्यात आला. या स्टंटबाजीदरम्यान तिथे असलेल्या अन्य गाड्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी केवळ दंड ठोठावला नाही तर या पाचही गाड्या जप्त केल्या आहेत.

हेही वाचा :  Gautami Patilचा व्हिडीओ व्हायरल होताच रुपाली चाकणकर भडकल्या; पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश

3.96 लाखांचा दंड

नोएडा वाहतूक पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन प्रचंड वेगाने कार चालवत स्टंटबाजी करणाऱ्यांना दंड ठोठावल्याचे फोटो शेअर केले आहेत. या सर्वांचे 12 ई-चालान कापण्यात आलेत. या एका प्रकरणामध्ये आधीचा आणि नवा दंड असे एकूण 3.96 लाखांचा दंड पोलिसांनी या 5 गाड्यांच्या मालकांना ठोठावला आहे. मात्र त्यांना हा दंड नेमक्या कोणकोणत्या कारणांसाठी सुनावण्यात आला हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.  

वऱ्हाडातील कार्स असल्याची शंका

बेदरकारपणे कार चालवत स्वत:बरोबर या लोकांनी इथरांचागही जीव धोक्यात टाकला. उत्तर भारतामध्ये सध्या लग्नांचा कालावधी असल्याने हा ताफा एखाद्या लग्नाच्या वऱ्हाडातील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळ्याला जाताना दौलतजादा करण्याच्या नादात त्यांनी ही स्टंटबाजी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …