Traffic police chalan : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?

Traffic Rules you must know: रस्त्यावर वाहन चालवताना बऱ्याचदा ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) काही न काही कारणांसाठी थांबवतात. जर आपण नियमांचे पालन करत आहोत आणि नियमांचे उल्लंघन होत नसेल तर आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. परंतू र्दुदैव असे आहे की भारतात आपण पोलीसांच्या वागणुकीचे प्रत्यक्षिके एकतो आणि पाहतो. अशा वेळेस वाहनधारकांना आपल्या अधिकारांविषयी माहिती असणे खुप महत्तवाचे आहे.  (Know the rights of the traffic police 5 rules)

ही महत्तवाची कागदपत्र नेहमी सोबत ठेवा

तुम्हाला अडचणीत यायचे नसेल तर वाहन चालवताना काही महत्तवाचे कागदपत्र नेहमी सोबत ठेवा.

नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) (Registration certificate) 

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) (Pollution under control)   

विमा दस्तऐवज (Insurance document)

वाहन चालवण्याचा परवाना (Driving licence)

(Know the rights of the traffic police 5 rules)

महत्त्वाचे नियम तुमच्यासाठी 
1. ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) हा नेहमी त्याच्या गणवेशात असला पाहिजे जर तो पोलीस गणवेशात नसेल तर तुम्ही त्याच्याजवळून ओळखपत्र  (Identification Card) मागू शकता. जर ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) ओळखपत्र दाखवायला तयार नसेल तर तुम्ही देखील तुमचे कागदपत्र दाखवायला नकार देऊ शकता. 

हेही वाचा :  Crime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...

2. जर कोणत्याही ट्रॅफिक नियमांचे उल्लघन केल्यास तुमच्यावर दंड (Fine) लागू केला जातो, त्या दंडाची पावती ई-चलान मशीन किंवा पावती बुक मध्ये येणे आवश्यक आहे. जर ती पावती तुमच्याजवळ नसेल तर एकप्रकारे तुम्ही लाच (Bribe) देत आहात असे गृहित धरले जाते.

3. जर ट्रॅफिक पोलीस तुमचे कोणतेही कागदपत्र (Document) जप्त करण्याचा निर्णय घेत असेल तर कागदपत्र (Document) जप्त करण्याचीदेखील पावती ट्रॅफिक पोलीसांकडुन (Traffic Police) घ्यायची. 

4. कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही. 

5. जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.

त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कधी ट्राफिक पोलीस तुम्हाला अडवतील तर या गोष्टी लक्षात ठेवा , तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल .  मात्र कुठल्याही अडचणींचा सामना करण्याआधी गाडी चालवण्याचे सर्व नियम लक्षात ठेवा आणि कुठलेही नियम तोडू नका अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल  (Know the rights of the traffic police 5 rules)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …