सिद्धार्थनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो ‘मै हूं दिवाना’ हे गाणं बोलताना दिसत आहे. सिद्धार्थ हे गाणं गाडीत बसून गाताना दिसतोय. तो गात असलेलं हे गाणं खिलाडी चित्रपटातील आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. ‘जबरदस्त लुक, खूप छान, फूल एन्जॉय, कडक’, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर येत आहे.
सिद्धार्थ जाधव लवकरच ‘गांधी टॉक्स’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी या कलाकारांसोबत काम करणार आहे. त्याच्या आनंदाच्या बातमीने त्याचे चाहते खूप खूश आहेत. तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम व्यतिरिक्त मराठी भाषेतही तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सिद्धार्थ जाधव एक उत्तम अभिनेता असून त्यानं मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटांत काम केलं आहे. दोन्ही ठिकाणी त्यानं आपल्या अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सिद्धार्थनं त्याच्या हटके शैलीनं एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या